Thursday, February 25, 2021
Home International News जो बायडननी लाइव्ह येत घेतली कोरोना प्रतिबंधक लस

जो बायडननी लाइव्ह येत घेतली कोरोना प्रतिबंधक लस

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांना फायझरकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. अमेरिकेत फायझरच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर संपूर्ण जगासमोर हे वृत्त आले. देशातील नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत विश्वास निर्माण करण्यासाठी बायडन यांनी लाईव्ह टीव्हीच्या माध्यमातून स्वत:ला ही लस टोचून घेतली. चिंतेचं कोणतंही कारण नाही, असं म्हणत त्यांनी लस घेतेवेळी देशातील नागरिकांना विश्वास देऊ केला. मॉडर्ना कंपनी द्वारे विकसित करण्यात आलेली लस अमेरिकेत दाखल झाली असतानाच बायडेन यांनी लसीचा पहिला डोस घेतला. अमेरिकेस यापूर्वी फायझर कंपनीचीही लस प्राप्त झाली आहे. बायडन यांना फायजर-बायोएनटेकची लस देण्यात आली. करोनाने आत्तापर्यंत अमेरिकेतील ३ लाख १७ हजार लोकांचे बळी घेतले आहेत. फायझर व मॉडर्ना या कंपन्यांच्या लसी उपलब्ध होत असूनही अमेरिकी नागरिकांमध्ये या लसीकरणाबाबत कमालीची साशंकता आहे. लसीकरणामुळे शरीरास अन्य अपाय होत असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर,  बायडेन यांनी थेट लाइव्ह येत लस टोचून घेतली. जेणेकरून कोरोना सारख्या महामारीला संपुष्टात आणण्यामध्ये आणि लसीकरण करून घेण्यात जनता भीती न बाळगता सहभागी होईल.

कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाली असे म्हणण्यात येत असले तरीही अमेरिकेमध्ये कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव झाल्याचं पाहायला मिळाले आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त झाले.. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशांमध्येही अमेरिकेचं नाव येते. अशा परिस्थितीमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी बायडन यांनी देशातील तमाम जनतेलाही लसीकरणात सहभागी होऊन ही लस टोचून घेण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांना कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. ७८ वर्षीय बायडन यांना तूर्तास कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. याचं थेट प्रक्षेपणही करण्यात आलं. जो बायडन हे कोरोनाच्या हाय रिस्क प्रवर्गात मोडतात. प्राधान्यक्रम मोडून लस घेण्याचा माझा हेतू नाही. मात्र हे लसीकरण किती सुरक्षित आहे,  हे देशवासीयांना दाखवण्यासाठी तसे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच मी जाहीरपणे लस घेणार असल्याचे बायडन यांनी याआधीच स्पष्ट केले होते. बायडेन यांची पत्नी जिल यांनाही त्यांच्यासोबत लस देण्यात येणार आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग फैलावला आहे. अमेरिकेत एक कोटी ७० लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत एकाच दिवसांत तब्बल चार लाख करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेत पुढील महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात होणार आहे. ही लस विकसित करण्यामध्ये, त्याची सुरक्षितता तपासणे यांसारख्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेले शास्त्रज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ आणि चाचण्यां मधील स्वयंसेवक यांच्याविषयी कृतघ्नता व्यक्त करून आम्ही आभारी असल्याचे बायडन यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments