Monday, March 1, 2021
Home International News कोरोनाचा नवा व्हेरिएंट केंट

कोरोनाचा नवा व्हेरिएंट केंट

कोविड-19 जीनोमिक्स यूकेचे कन्सोर्टियमच्या संचालिका शेरॉन पीकॉक म्हणाल्या की, केंट कोरोना व्हायरस व्हेरिएंट संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरला आहे आणि तो संपूर्ण जगभरात पसरेल. पण मला वाटतं की, भविष्यात आपण अनेक वर्षे हेच करणार आहोत. आपण सध्या सहा वर्षांपर्यंत या विषाणूविरुद्धची लढाई सुरु ठेवणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. युनायटेड किंग्डममध्ये कोरोना लस या व्हेरिएंटविरुद्ध प्रभावी ठरली होती. परंतु व्हायरसचं बदलतं रुप पाहता कदाचित लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो, असंही शेरॉन पीकॉक म्हणाल्या. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, ब्रिटनसोबतच दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्येही कोरोनाचे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. शेरॉन पीकॉक यांच्या मते ब्रिटिश व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य आहे. पण इतर व्हेरिएंटच्या तुलनेत तो जास्त धोकायदायक असेलच असं नाही. पण हा जगभरात पसरेल.

कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका सर्वाधिक असलेल्या देशांमधून येणाऱ्या लोकांवर कोरोविषयक नियमांचं उल्लंघन केल्यास ब्रिटनने सुमारे दहा लाख रुपयांचा दंड आणि दहा वर्षांचा तुरुंगवासाची तरतूद केली आहे. या नियमांमध्ये बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी 1,750 पौंडच्या पॅकेजचाही समावेश आहे. यात दहा दिवस हॉटेलमध्ये राहण्याचा, येण्या-जाण्याचा आणि दोन अनिवार्य आरटीपीसीआर चाचणीचा समावेश आहे. बाहेरुन येणाऱ्या सर्वांना 10 दिवन क्वॉरन्टीन राहावं लागेल. या क्वॉरन्टीनच्या दुसऱ्या आणि आठव्या दिवशी त्यांना आरटीपीसीआर चाचणी करणं गरजेचं आहे.

काही देशांमध्ये या विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने संसर्गाच्या चिंता अजून वाढल्या आहेत. आता कोरोना विषाणूबद्दल ब्रिटीश शास्त्रज्ञाने मोठा दावा केला आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, इंग्लंडच्या केंट (Kent) येथे आढळलेले कोरोना विषाणूचे नवे रूप संपूर्ण जगभर पसरेल. कोरोना व्हायरसने 2.35 दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे आणि कोट्यावधी लोकांचे सामान्य जीवन बदलले आहे, परंतु आता काही नवीन चिंताग्रस्त प्रकारांची भीती निर्माण झाली आहे. ज्यांच्यासाठी पुन्हा नव्याने लस तयार कराव्या लागतील आणि लोकांना पुन्हा बूस्टर शॉट्सची आवश्यकता भासेल. महत्वाचे म्हणजे काही आठवडे आणि महिन्यांमध्ये या व्हायरसच्या प्रकाराचे रूप बदलत आहे. पुढे त्याचे नवीन उत्परिवर्तन सुरू होत आहे, ज्यामुळे लसची कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने व्हायरसच्या हाताळण्याच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments