Monday, March 1, 2021
Home International News चाचणीनंतर फायजर लस घेणारी ९० वर्षीय ठरली प्रथम महिला

चाचणीनंतर फायजर लस घेणारी ९० वर्षीय ठरली प्रथम महिला

ब्रिटनच्या औषधे आणि आरोग्य उत्पादन नियामक संस्थेने मागील आठवड्यातच या लसीला मंजुरी दिली होती. आयर्लंडमधील एका ९० वर्षीय महिलेला फायझर बायोएनटेकची लस देण्यात आली आहे. करोनाची लस दिली जाणारी ती जगातली पहिली व्यक्ती ठरली आहे. लस घेणाऱ्यांमध्ये ८७ वर्षांचे भारतीय वंशाचे नागरीक हरी शुक्ला यांचाही समावेश आहे. शुक्ला यांना न्यूकॅसल येथील एका रुग्णालयात फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येणार आहे. लस टोचून घेणे हे आपले कर्तव्य असल्याची प्रतिक्रिया शुक्ला यांनी व्यक्त केली. जागतिक महासाथीचा आजार असलेल्या करोनाच्या शेवटाकडे आपण जात असून लस घेऊन मी आपली जबाबदारी पूर्ण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये सामूहिक लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला असून मार्गारेट किनान हे पहिली लस टोचण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मार्गारेट किनान या एनिस्किलेन येथील रहिवासी असून लस दिल्यानंतर फार बरे वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कोवेंट्री युनिव्हर्सिटी हॉस्पिटल येथे त्यांना लस देण्यात आली. किनान एका आठवड्यांनी ९१ वर्षांच्या होणार आहेत. आपल्या वाढदिवसाच्या अगोदरच आपल्याला ही सगळ्यात मोठी भेट मिळाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. लस घेतल्यामुळे मी आता कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवारासोबत नव्या वर्षाचे स्वागत कोणत्याही भीतीशिवाय करू शकतो. करोनाची लस दिली जाणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्याचा मान मिळाल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या उपस्थितीतच लस घेतली. आतापर्यंत लसीच्या चाचणीच्या टप्प्यात अनेक स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे.

Pfizer Covid-19 vaccine

आपल्या मित्रपरिवारात मॅगी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या किनान एका ज्वेलर शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करतात. त्या चार वर्षांपूर्वी निवृत्त झाल्या आहेत. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असून चार नातवंडे आहेत. त्यांना लस देतानाच्या क्‍लिप जारी करण्यात आल्या असून त्यांना लस दिली जात होती, त्यावेळी त्यांनी मास्क घातला होता. गेले काही महिने फार खडतर होते. मात्र आता अंधकार दूर होत असून पुन्हा प्रकाशाचे किरण दिसू लागले आहेत, असे किनान यांना लस देणाऱ्या परिचारिका मे पार्संस यांनी म्हटले आहे.पार्संस या मूळच्या फिलिपिन्स येथील असून त्या गेल्या २४ वर्षांपासून ब्रिटनच्या आरोग्य सेवेत काम करत आहेत.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील मंगळवारचा दिवस ब्रिटनसाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. मंगळवारी ब्रिटनमध्ये ‘व्ही-डे’ अर्थात वॅक्सिन-डे असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments