फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांची जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून तिसर्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. मग कोणाची वर्णी तिसर्या स्थानी लागली आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कोरोना व्हायरस मुळे एकीकडे अनेक उद्योगधंद्याना त्याचप्रमाणे नोकरदार वर्गाला मोठ्या कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला आहे. तर काही व्यवसायांना याचा फायदा मिळत आहे. कोरोना संकटामुळे अनेक अशा कंपन्या आहेत, ज्यांना बंद कराव्या लागल्या आहेत. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तिसर्या स्थानावर जागा पटकावली आहे ती, स्पेस-एक्स आणि टेस्ला इलेक्ट्रीक कंपनीचे चे प्रमुख एलन मस्क यांचे. त्यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एलन मस्क आता जगभरातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला एसएंडपी ५०० कंपन्यांच्या यादीमध्ये सहभागी करण्यात आले आहे. एलन मस्क यांच्या रॉकेट कंपनीने चार अंतराळवीरांना अंतराळात पाठवलं आहे. या नंतर एकाच दिवसांत एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये ७.६१ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. या व्यतिरिक्त मस्क यांच्या वार्षिक संपत्तीमध्ये आतापर्यंत ८२ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. या वर्षामध्ये संपत्तीमध्ये वाढ झाल्याने एलन मस्क यांचं नाव या यादीत सर्वात पहिलं येतं. मस्क यांच्या संपत्तीमध्ये ५०० श्रीमंत व्यक्तींच्या तुलनेत सर्वाधिक वाढ झाली आहे. त्याच प्रमाणे टेस्ला कंपनीच्या एलन मस्क यांच्यानंतर दुसरे नाव ऑनलाईन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आहेत. यावर्षी जवळपास ७० अब्ज डॉलर्सची त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे.
जगभरातील टॉप-१० श्रीमंतांमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये अॅमेझॉनचे जेफ बेजोस आहेत. त्यांची एकूण संपत्ती १८५ अब्ज डॉलर आहे. मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स १२९ अब्ज डॉलर, टेस्ला आणि स्पेस-एक्सचे एलन मस्क ११० अब्ज डॉलर, फेसबुकचे मार्क झुकरबर्ग १०४ अब्ज डॉलर, एलवीएमएचचे बर्नार्ड अर्नाल्ट १०२ अब्ज डॉलर, बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफेट ८८ अब्ज, गूगल के लैरी पेज ८२.७ अब्ज, गूगलचे सर्जी ब्रिन, ८० अब्ज डॉलर, मायक्रोसॉफ्टचे स्टीव बॉलमर यांची संपत्ती ७७.५ अब्ज डॉलर आणि रिलायंस इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ७५.५ अब्ज डॉलर आहे.