Sunday, March 7, 2021
Home International News लंडन महापौरांनी केली घोषणा Major Incident ची

लंडन महापौरांनी केली घोषणा Major Incident ची

काय आहे Major Incident ! जेव्हा संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार माजवला होता, त्यावेळच्या परिस्थितीपेक्षाही जवळपास ३५ टक्के जास्त रुग्ण सध्याच्या घडीला लंडनला आढळले आहेत. अधिकृत आकडेवारी पाहिल्यास येथील एका पालिका क्षेत्रात आठवड्यास ५ हजाराहून जास्त नवे कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत.

सुत्रांच्या माहितीनुसार मागील आठवड्यात ६ हजार कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. ही सर्व परिस्थिती पाहता सादिक खान यांच्या ट्विटनं सर्वांच्या मनात असणारी भीती आणखी वाढवली. त्यांनी ट्विट करत लिहिलं,  मी लंडनमध्ये Major Incident ची घोषणा करत आहे. कारण, कोरोनाच्या संकटानं आता धोक्याची पटली ओलांडली आहे. लंडनमधील दर ३० नागरिकांमागे एका नागरिक हा कोरोनाग्रस्त आहे. आताच सावधगिरीची पाऊले उचलली नाहीत, तर आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढून मृत्यूदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवता येते आहे. Major Incident हा शब्द सहसा एखादी मोठी घटना किंवा एखादी अशी घटना जिचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येण्याची खात्री आहे आणि जी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष आखणी करावी लागते.

“व्हायरसचा संसर्ग कमी झाला नाही तर येत्या काही आठवड्यांमध्ये हॉस्पिटलमध्ये बेड्सची टंचाई जाणवू शकते. ही आणीबाणीची परिस्थिती असल्याचं आम्ही जाहीर करत आहोत. या व्हायरसनं आम्हाला धोक्याच्या बिंदू जवळ आणून ठेवलं आहे. आता लवकर योग्य पावलं उचलली नाहीत तर राष्ट्रीय आरोग्य सेवेवरचा ताण आणखी वाढेल. त्यामुळे मोठ्या प्रमाणत संसर्ग होऊन जास्त प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडू शकतात, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या विषयावर ब्रिटीश सरकारनं मदत करावी असं खान यांनी आवाहन केलं आहे. नव्या कोरोना व्हायरस स्ट्रेनमुळे ब्रिटनमधील परिस्थिती रोज गंभीर होत आहे. लंडनचे महापौर सादिक खान  यांनी याबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. कोरोना पेशंट्सची संख्या आगामी काळात वाढण्याची भीती त्यांनी बोलून दाखवली आहे.

त्याचप्रमाणे, लंडनच्या नागरिकांनी सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं असं खान यांनी म्हंटलं आहे. अगदी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेरपडा, नाहीतर घराच्या बाहेर पडू नका. तुम्ही, तुमचे कुटुंब, तुमचा मित्रपरिवार आणि लंडन शहर याचं संरक्षण करण्यासाठी घरामध्ये राहणं आवश्यक आहे, अशी विनंती खान यांनी केली. लंडन मधील परिस्थिती झपाट्यानं बिघडत असून एप्रिल महिन्यापेक्षा तिप्पट पेशंट्स सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. लंडनच्या हॉस्पिटलमधील कोरोना पेशंट्सच्या संख्येत गेल्या काही आठवड्यांमध्ये २७  टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर व्हेंटीलेटर्सची संख्या देखील ४२ टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. ‘‘नवा कोरोना स्ट्रेन रोखण्यासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतलेल्या निर्णयांचा फायदा नक्कीच होईल ’’ अशी आशा खान यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments