Sunday, March 7, 2021
Home International News जगातील सर्वात उंच पर्वत झाला अजून उंच

जगातील सर्वात उंच पर्वत झाला अजून उंच

माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची ८,८४८ मीटर इतकी असून ते नेपाळ व चीन ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. माउंट एव्हरेस्ट हा जगातील सर्वात उंच पर्वत असल्याने जगातील सर्वच गिर्यारोहकांचे याला सर करण्याचे स्वप्न असते. अनेक गिर्यारोहक भरमसाठ किंमत मोजून हे शिखर सर करण्याचा प्रयत्‍न करतात. माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के २ अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही ८,००० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत,  परंतु अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात.

नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप कुमार ज्ञावली आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही घोषणा केली. दरम्यान माऊंट एव्हरेस्ट पर्वत चीन आणि नेपाळमधील मैत्रीचं प्रतीक असल्याचं मत प्रदीप कुमार ज्ञावली यांनी व्यक्त केलं. १९५४ मध्ये भारत सरकारने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. तेव्हा माऊंट एव्हरेस्टची उंची ८,८४८ मीटर इतकी भरली होती. याच माहितीचा वापर आतापर्यंत नेपाळकडून केला जात होता. तसंच २००५ मध्ये चीनने माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती, तेव्हा या पर्वताची उंची ८.८४४.४३ मीटर इतकी भरली होती. त्यानंतर आता नेपाळ आणि चीनने माऊंट एव्हरेस्टची स्वतंत्रपणे उंची मोजली असून या पर्वताची उंची ८८४८.८६ मीटर इतकी भरत असल्याचं समोर आले आहे. ही उंची भारत सरकारने १९५४ मध्ये मोजलेल्या उंचीपेक्षा 0.८६ मीटरने जास्त भरली आहे. या २०१५ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या तीव्र भूकंपानंतर, असा अंदाज व्यक्त केला जात होता की माऊंट एव्हरेस्टची उंची ८,८४८ मीटर इतकी राहिली नाही. म्हणून नेपाळने जगाच्या सर्वोच्च शिखराची उंची मोजण्याची तयारी केली. यानंतर नेपाळच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आज माउंट एव्हरेस्टची अधिकृत उंची ८८४८.८६ मीटर जाहीर केली आहे. नेपाळने चीनसोबत मिळून या काम केलं आहे. चीनने काही दिवसांपूर्वी ३० सदस्यांचं सर्वेक्षण दल नेपाळमध्ये पाठवलं होतं. माऊंट चोमोलुंगमा बेस कॅम्पवरुन एव्हरेस्टची चढाई या दलाने सुरु केली होती. चीन आणि नेपाळने संयुक्तरित्या माऊंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचं काम केलं. सर्वात अलीकडे एव्हरेस्ट ची उंची ८,८४८ मीटर इतकी उंची अधिकृतरीत्या निश्चित करण्यात आली आहे. तरीही अनेक मापनकर्त्यांच्या मापनांत तफावत आढळून येते.

९ ऑक्टोबर २००५ रोजी चीनने केलेल्या मोजणीप्रमाणे पर्वताची उंची ८,८४४.४३ मीटर ± ०.२१ मीटर इतकी नोंदवण्यात आली आहे. ही उंची एव्हरेस्टवरील बर्फाच्या लादीची उंची वजा जिथे खडक जेथे संपतो तेथवरून काढली आहे. चिनी मापनकर्त्यांना लादीची उंची साधारणपणे ३.५ मीटर इतकी आढळली, खडक व बर्फाची लादी या दोघांची मिळून एकत्र उंची ८,८४८ इतकी निश्चित करण्यात आली आहे. पर्वताची उंची मोजण्यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सॅटेलाईट सिस्टिमचा वापर करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments