Friday, February 26, 2021
Home International News कोरोना व्हायरसची नवीन प्रजाती किती धोकादायक !

कोरोना व्हायरसची नवीन प्रजाती किती धोकादायक !

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय की, विषाणूच्या नव्या प्रजातीविषयी ठोस अशी माहिती नाहीये. पण यामुळे कोरोनाची लागण होते आणि पहिल्यापेक्षा ७०टक्के अधिक वेगाने त्याचा प्रसार होतो. यावरून कोरोना व्हायरसची ही नवी प्रजाती किती वेगानं पसरतेय याचा तुम्हाला अंदाज येईल. सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदा या प्रजातीविषयी माहिती मिळाली. नोव्हेंबरमध्ये कोरोनाच्या एक-चतुर्थांश रुग्णांमध्ये ही प्रजाती आढळून आली. डिसेंबरमध्ये एकूण कोरोना रुग्णांच्या दोन-तृतीयांश रुग्णांमध्ये ही प्रजाती आढळली. शुक्रवारी इम्पिरिअल कॉलेज लंडन येथील डॉ. एरिक व्होल्झ यांनी सादर केलेल्या सादरीकरणात ही ७०% संख्या दिसून आली. चर्चे दरम्यान ते म्हणाले, “हे सांगणं खरोखरच घाईचं होईल. पण, आतापर्यंत आपण जे पाहत आहोत त्यावरून ही प्रजाती वेगाने पसरत आहे. यापूर्वी कधीही पसरली नाही त्या वेगाने पसरत आहे. त्यामुळे यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. “ही प्रजाती किती संसर्गजन्य असू शकते, याचा निश्चित असा आकडा नाही.पण, हा प्रसार ७० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७० टक्क्यांहून कमीसुद्धा असू शकतो, असं मला या विषयावर काम करणाऱ्या काही तज्ज्ञांनी सांगितलं. पण, ही प्रजाती अधिक संसर्गजन्य आहे की नाही, हा प्रश्न कायम राहतो. नॉटिंग्हम विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रो. जोनाथन बॉल म्हणाले, “सार्वजनिक क्षेत्रातील पुराव्यांचं प्रमाण पुरेसे नाही आहे. त्यामुळे व्हायरसचा संसर्ग खरोखरच वाढला आहे का याविषयीचे ठाम मत आताच सांगता येणार नाही.”

new covid virus in UK

ही प्रजाती एक तर यूकेमधील एखाद्या रूग्णात सापडली किंवा मग कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा नसलेल्या देशातून इंग्लंडमध्ये पोहोचली. ही नवीन प्रजाती इंग्लंडमध्ये सगळीकडे आढळून आली आहे. पण, लंडनमध्ये अधिकाधिक रुग्णांमध्ये ती आढळली आहे. जगभरातील विषाणूच्या अनुवांशिक नमुन्यांवर नजर ठेवणाऱ्या Next strain ची आकडेवारी सांगते की, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियामध्ये ही प्रजाती आढळून आली आहे आणि तिथे ब्रिटनमधून आलेल्या रुग्णांमुळेच तो आढळला आहे. नेदरलँडमध्येही काही प्रकरणं निदर्शनास आली आहेत. दक्षिण आफ्रिकेत या प्रजाती प्रमाणेच एक प्रजात आढळली आहे,  पण या दोन्ही प्रजातींमध्ये काही संबंध नसल्याचे समोर आले आहे.

कोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत आहे. पण ही प्रजात जास्त जीवघेणी नाही. युकेसह नेदरलँड्स, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही नवी प्रजात सापडल्याचे WHO ने सांगितले. त्याचप्रमाणे भारतातही कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही असं मत डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे आणि सरकार जागरूक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments