जगातील अनेक देशांना अजूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. सध्या विविध देशांमध्ये वेळीच केलेल्या उपाययोजना आणि करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळेच आतापर्यंत अनेकांना याची लागण झाली नाही आणि मृत्यूदर अजून वाढला नाही. जगातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता वेगवेगळे देश कोरोनावर लस तयार करण्याचे काम युद्ध्पातळीवर करत आहेत. अजूनही कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. काही देशांमध्ये कोरोनाच्या टप्प्याची सुरुवात झाली असून काही देश अजूनही कोरोनाच्या लाटेबद्द्ल अजून साशंक आहेत. लस उपलब्ध झाल्यास कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण आटोक्यात येण्यास मदत होईल. लस निर्माण केल्याने मानवी शरीर कोरोना विषाणूला प्रतिकार करण्यास तयार राहील. यामुळे मुळातच कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही किंवा संसर्ग झालाच तर त्याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसून येणार नाहीत. लस, योग्य उपचार पद्धती आणि त्याबरोबरचं घेतलेली खबरदारी या गोष्टी एकत्रित आल्या तरच कोरोना व्हायरसची ही साथ आटोक्यात येऊ शकेल.
The UK has become the first country in the world to authorize use of the Pfizer/BioNTech COVID-19 vaccine, with vaccination beginning early next week. https://t.co/xTM3ustbTP pic.twitter.com/6TVce6oEW0
— WebMD (@WebMD) December 2, 2020
फायजरची करोना लस ९० टक्के प्रभावी असल्याचे चाचणीत समोर आले होते. आता पुढील आठवड्यापासून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. योग्य चाचणी केल्यानंतर लसीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटले. करोनाच्या दुसऱ्या टप्प्यात असणा-या ब्रिटनने फायजरच्या लसीला मंजुरी दिली आहे. फायजरने विकसित केलेली करोना लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. फायजर कंपनी ही कोरोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेक सोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. ही कोरोनाच्या विषाणूंचा खात्मा करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. फायजरच्या लस चाचणीचा संपूर्ण डेटा येत्या काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून तिचे निदान २ डोस तरी प्रत्येक व्यक्तीला घ्यावे लागणार आहेत. वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत फायजरने याआधीच आपत्कालीन परिस्थितीत लस वापरासाठी मंजुरी देण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. पुढील महिन्यात लसीबाबतच्या समितीची बैठक पार पडणार असून फायजरच्या लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अमेरिकेत ११ किंवा १२ डिसेंबरपासून लस उपलब्ध होण्यास सुरुवात होईल असे संकेत व्हाइट हाउसमधून देण्यात आले आहेत.