कोव्हिशील्डला ३ जानेवारी रोजी भारतातील औषध नियामकाने आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. १६ जानेवारीपासून भारतात सुरू झालेल्या लसीकरणासाठी सरकारने सीरम कडून कोविशील्डच्या १.१ कोटी डोस घेण्याचा करार केला. ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्रॅजेनेका यांनी एकत्रित मिळून कोव्हिशील्ड लस निर्माण केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोज अॅडनॉम घेब्रेयेसस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्हाला आशा आहे की लवकरच सीरम जलद मूल्यांकनासाठी संपूर्ण डेटा सेट उपलब्ध केला जाईल. याच्या आधारे, डब्ल्यूएचओ निर्णय घेईल की अॅस्ट्रॅजेनेकाची लस आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जाऊ शकते कि नाही!
पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्डला लवकरच जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरण्याची परवानगी मिळू शकते. एक दिवसात भारताने जगात सर्वाधिक लोकांना लस दिली आहे. कोविन अॅपमधील तांत्रिक समस्येमुळे महाराष्ट्रात १८ जानेवारीपर्यंत लसीकरण होणार नाही. केंद्राने राज्यांना जानेवारीत १० दिवस लसीकरण करण्यास सांगितले आहे. राज्यांनी त्या हिशेबाने दिवस निश्चित केले आहेत, त्यामुळे रविवारी अनेक राज्यांत लसीकरण झाले नाही.
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताची प्रशंसा करत म्हटले की, तो जगाच्या फार्मसीच्या रूपात, संपूर्ण जगात ५०% पेक्षा जास्त लसींचा पुरवठा करत आहे. भारतात कोरोना लसीकरण मोहिमेला दोन दिवस पूर्ण झाले. रविवारी आंध्र, अरुणाचल, केरळ, कर्नाटक, मणिपूर, तामिळनाडूत एकूण १७,०७२ जणांना लस देण्यात आली. शनिवारी २,०७,२२९ जणांना लस देण्यात आली होती. २४ तास उलटल्यानंतर त्यापैकी ४४७ जणांमध्येच किरकोळ साइड इफेक्ट दिसले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत एकूण २,२४,३०१ लोकांना लस टोचण्यात आली आहे.
लस घेणे टाळू नका. प्राण्यांवरील चाचणीपासून मानवी चाचणीपर्यंत सिद्ध झाले आहे की, कोणतेही गंभीर साइड इफेक्ट्स नाहीत. जगात एक कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. कोठेही लसीमुळे गंभीर साइड इफेक्ट्स झाल्याचे वृत्त नाही. जगात अद्याप पूर्णपणे लसीच्या प्रभावाची आकडेवारी आलेली नाही. स्थिती गंभीर असल्याने आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. महामारीची स्थिती नसती तर वर्ष किंवा सहा महिन्यांपर्यंत लसीचा प्रभाव हळूहळू पारखून घेता आला असता. जर तो ६० ते ९० टक्के असला तरीही तुम्हाला संरक्षण देईल. या विषाणूची साखळी तोडण्यासाठी लस घेणे हाच एकमेव पर्याय आहे.