Thursday, February 25, 2021
Home International News अमेरिकेच्या नवीन पर्वाची उद्या सुरुवात

अमेरिकेच्या नवीन पर्वाची उद्या सुरुवात

बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबतच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरिस शपथ घेणार आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा २० जानेवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन यांचा शपथविधी समारंभापूर्वी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी जवळपास ३५ हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शपथविधी समारंभ अत्यंत साधेपणानं साजरा करण्यात येणार आहे असे दिसून येते आहे.

बायडन राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेले काही विवादीत निर्णय पलटू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, बायडन यांनी आपल्या कार्यकाळापूर्वी १० दिवसांत घेतलेल्या निर्णयांची यादी तयार केली आहे. या यादीत मुस्लिम देशांवर घालण्यात आलेलेल प्रतिबंध रद्द करण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. शपथविधी समारंभानंतर ते इतरही अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर आपली स्वाक्षरी करु शकतात.

The new dawn of America begins tomorrow

अमेरिकेतील वेळेनुसार, शपथविधी सकाळी १० वाजता सुरु होणार आहेत. दरम्यान, वॉशिंग्टनची वेळ भारतीय वेळेहून १० तास ३० मिनिटं पुढे आहे. शपथ  घेतल्यानंतर जो बायडन देशाला संबोधित करणार आहेत. असं मानलं जात आहे की, या संबोधना दरम्यान बायडन पुढील ४ वर्षांसाठी राष्ट्राप्रतीचं त्यांचं म्हणणे किंवा असलेले ध्येय सांगू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कोरोनाविरोधातील लढा, अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासोबतच राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या योजनांवर प्रकाश टाकतील.

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की ते जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. ७८ वर्षीय डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन २० जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर, ५६ वर्षीय भारतीय वंशाच्या नेत्या कमला हॅरिस उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील. आपल्या ट्विटर अकाऊंटवर १२ तासांच्या बंदीनंतर ट्रम्प यांनी दोन ट्विट केले. ते म्हणाले, “जे लोक विचारत आहेत त्यांना मी सांगेन की मी २० जानेवारीला शपथविधी कार्यक्रमाला जाणार नाही.” कॅपिटल हिल्सवरील हिंसाचारानंतर सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. शपथ समारंभाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेथील सुरक्षा वाढवून ३५ हजारांहून जास्त नॅशनल गार्ड‌्स तैनात करण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments