Monday, March 1, 2021
Home International News अखेर डब्लूएचओने फायजर लसीला दिली मान्यता

अखेर डब्लूएचओने फायजर लसीला दिली मान्यता

डब्लूएचओने आपल्या आणि जगभरातील तज्ज्ञांद्वारे फायजर लसीच्या सुरक्षा, प्रभावी आणि गुणवत्तेच्या माहितीची पडताळणी केली. याचे फायदे आणि जोखिमांचं मूल्यांकन केलं. डब्लूएचओने निश्चित केलेल्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या निकषावर ही लस परिणामकार ठरते,  असं त्यांनी सांगितले.

(WHO) जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी ३१ डिसेंबर रोजी फायजर-बायोटेक  लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीनंतर डब्लूएचओकडून एखाद्या लसीला मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूएचओच्या या निर्णयानंतर अनेक देशांसाठी मार्ग मोकळा झाला आहे की, ते फायजर-बायोटेक लसीच्या आयातीला मंजुरी देऊन वितरणाला सुरुवात करतील. डब्लूएचओने म्हटलं आहे की, कोरोना महामारी आल्यानंतर संघटनेकडून इमर्जन्सी वापराला मंजुरी देण्यात आलेली फायजर-बायोटेक ही पहिलीच लस आहे. कोरोना लसीची जागतिक पोहोच सुनिश्चित करण्यासाठी हे एक अतिशय सकारात्मक पाऊल आहे, असे डब्लूएचओचे वरिष्ठ अधिकारी मॅरिएंगेला सिमाओ यांनी म्हटले आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड आणि फायजरने इमर्जन्सी वापरासाठी मंजुरी मागितली आहे. कोणत्या कोरोना लसीला पहिल्यांदा मंजुरी मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नव्हते, परंतु भारत सरकारने यासाठी तयारी पूर्ण केली आहे. कोल्ड स्टोअरेजपासून वॅक्सिनेटरचं प्रशिक्षण आणि ज्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे त्यांची माहिती जमा केली आहे. पहिल्या टप्प्यात ही लस तीस कोटी नागरिकांना दिली जाईल, ज्यासाठी प्राथमिकता निश्चित केली आहे.  केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमटीची आज कोरोना लसीसंदर्भात बैठक आहे. ज्यांनी इमर्जन्सी यूज ऑथोरायझेशनची परवानगी मागितली आहे अशा तीन कंपन्यांच्या डेटाचं व्यवस्थापन या बैठकीत होणार आहे. या समितीच्या शिफारशीवर डीसीजीआय निर्णय घेणार आहे.

कोरोनाची लस सर्वात आधी आरोग्य कर्माचारी, मग फ्रण्टलाईन कर्मचारी आणि त्यानंतर ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या तसंच ५० वर्षांखालील वयाचे लोक ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांना ही लस दिली जाईल. ब्रिटनने सर्वात आधी म्हणजेच ८ डिसेंबरला या लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन देशांनीही या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाच्या ड्राय रन म्हणजेच रंगीत तालमीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यात जनजागृतीसंबंधीची माहिती दाखवण्यासाठी तसेच याठिकाणी आयईसी संबंधित सर्व सामग्रीचे प्रदर्शन करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध असली पाहिजे, याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments