Monday, March 1, 2021
Home International News बायडन यांनी घडवून आणले हे बदल

बायडन यांनी घडवून आणले हे बदल

कोरोनाच्या पृष्ठभूमीवर व्हाइट हाऊसच्या कामकाजाच्या पद्धतीत अनेक बदल करण्यात आले आहेत. जो बायडेन अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. त्यांचे वय ७८ वर्षे आहे. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गापासून वाचवणे हे त्यांच्या प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे सुमारे ५० टक्के अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. निवडक उच्च अधिकाऱ्यांच्या छोट्या समूहाला व्हाइट हाऊसमधून काम करण्यासाठी बोलावले जात आहे. तथापि, त्यांनाही कोरोनाशी संबंधित नियम-अटींचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे यांचा समावेश आहे.

कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका वयोवृद्धांना आहे. कारण त्यांची प्रतिकारक्षमता तेवढी पावरफुल राहिलेली नसते. त्यामुळे व्हाइट हाऊस विशेष काळजी घेत आहे. बायडेन यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असला तरी कुठलीही जोखीम घेण्याची प्रशासनाची इच्छा नाही. व्हाइट हाऊसचे व्यवस्थापन संचालक जेफ्री व्हेक्सलर यांच्यावर कोरोनाशी संबंधित सुरक्षेच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनात व्हाइट हाऊसमध्ये तीन वेळा कोरोनाचा संसर्ग झाला, स्वत: ट्रम्प यांनाही कोरोना झाला होता त्यामुळे विशेष काळजी घेतली जात आहे. अधिकारी  कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडप्रमाणे आता कोरोना चाचणी रिस्ट बँडचाही समावेश करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्षांच्या सर्व कार्यक्रमांत फिजिकल डिस्टन्सिंगची विशेष व्यवस्था राहील. एवढेच नाही तर उपाध्यक्ष कमला हॅरिसही बायडेन यांच्यापासून सुरक्षित अंतरावरच राहतील.

पदभार स्विकारल्यानंतर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयात बदल केले आहेत. आता H1B वीसा धारकांच्या जोडीदारांना अमेरिकेत काम करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अमेरिकेत एच-१बी  व्हिसा दरवर्षी ८५ हजार जणांना देण्यात येतो. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर बंदी घातली होती. यामुळे अमेरिकेतील नागरिकांचा रोजगार हिरावला जाईल, असे कारण ट्रम्प यांनी दिले होते. ट्रम्प प्रशासनाचा हा निर्णय अमेरिकेत नोकरी करणाऱ्या आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीयांसाठी धक्का असल्याचे बोलले जाते. परंतु, बायडेन यांच्या या निर्णयानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय आयटी प्रोफेशनल्सला काहीसा दिलासा मिळाला आहे. २०१५ मध्ये तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी H1B वीसा धारकांच्या जोडीदाराला  जे कोणीही असतील पती अथवा पत्नी अमेरिकेत काम करण्याची मंजुरी दिली होती. यासाठी H4 वीसाची आवश्यकता होती. यापूर्वी त्यांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी नव्हती. बायडेन यांच्या या निर्णयामुळे अंदाजे एक लाख भारतीयांना याचा फायदा होईल. मागील चार वर्षांपासून त्यांना परत अमेरिकेत काम करता येईल, का नाही ? अशी चिंता होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments