Saturday, March 6, 2021
Home International News ब्रिटनमध्ये तिसऱ्या लसीला मंजुरी

ब्रिटनमध्ये तिसऱ्या लसीला मंजुरी

मॉडर्ना लसीच्या ३० हजाराहून अधिक लोकांवर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये ही कोरोना लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे. मॉडर्ना लसीच्या वापरास अमेरिकेत यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. आता यूकेमध्ये फायझर-बायोटेक आणि ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका या लसींमध्ये लसीकरणात त्याचा समावेश केला जाऊ शकतो. या दोन लसी गेल्या वर्षी मंजूर झाल्यानंतर राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या  लसीकरण मोहिमेमध्ये यांचा समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनच्या ड्रग नियामक प्राधिकरणाने शुक्रवारी अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना निर्मित कोविड-१९ लस वापरण्यास मान्यता दिली आहे. ही ब्रिटनमध्ये मंजूर होणारी तिसरी कोरोना विषाणूची लस असेल.

फाइजर आणि बायोटेक लसीसारखे काम करणारी मोडर्ना लस शून ते २० डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवावी लागणार आहे. ब्रिटनमधील वापरासाठी आतापर्यंत मंजूर झालेल्या तीन लसींचे दोन डोस देण्यात येणार आहेत. यूकेमध्ये आतापर्यंत सुमारे १५  लाख लोकांना कोविड-१९  लसीचा कमीतकमी एक डोस मिळाला आहे.  मार्चपर्यंत नवीन लसीचा पुरवठा होणे अवघड आहे. कारण ब्रिटनने ७० लाख डोसांची ऑर्डर दिली आहे. याचे उत्पादन प्रथम अमेरिकेत होत आहेत आणि युरोपमधील उत्पादनास थोडा वेळ लागू शकेल. मोडर्ना लसीच्या ३० हजाराहून अधिक लोकांवर घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये ही कोरोना लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे समोर आले आहे.

कोरोना लसीच्या पहिल्या लसीकरणानंतर पुढील काही आठवड्यानंतर लोक त्यातून काही प्रमाणात संरक्षण मिळवण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र, लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पुढील काही आठवड्यांत संपूर्ण बचाव शक्य होईल.  वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लस तज्ज्ञ, डेबोरा फुलर म्हणाले फायझर आणि मॉडर्नाची लस कोरोना विषाणूच्या संसर्गापासून पूर्णपणे संरक्षण देते की फक्त त्याच्या लक्षणांबद्दल अद्याप हे पूर्णपणे उघड झाले नाही. याचा अर्थ असा आहे की लस घेतल्यानंतरही लोक संक्रमित होऊ शकतात. याचा प्रसारही लस घेतलेल्या व्यक्तीमार्फत होऊ शकतो. मात्र, अशा शक्यता फार कमी आहेत.

कोविड १९ लस घेतल्यानंतर मास्क घालण्याची गरज भासणार का? लसीकरणा नंतरही सोशल डिस्टन्स आवश्यक राहील का? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मात्र, लसीकरणा नंतरही लोकांना पुढील काही दिवस मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचा सल्ला जाईल

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments