Sunday, March 7, 2021
Home International News ट्वीटरच्या महिमा कौल यांचा राजीनामा

ट्वीटरच्या महिमा कौल यांचा राजीनामा

शेतकरी आंदोलनादरम्यान ग्लोबल सेलिब्रिटींच्या ट्वीटवरून भारतात जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यात महिमा यांच्या राजीनाम्याची माहिती समोर येण्यामुळे जास्त चर्चा होण्याची शक्यता आहे. शेतकरी आंदोलनावर पॉप स्टार रिहानानं ट्विट केल्यानंतर देशात राजकारण रंगलं आहे. रिहानाच्या ट्विटनंतर एकाच वेळी भारतातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. तर, विरोधकांनी कलाकारांच्या ट्विटमागे केंद्र सरकारचा दबाव असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, आंदोलनाबाबत कलाकारांनी केलेल्या ट्विटनंतर आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महिमा कौल ट्विटरच्या भारत आणि दक्षिण आशिया पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आहेत. त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मात्र तरीही मार्चपर्यंत त्या आपली अधिकृत जबाबदारी पार पाडणार आहेत. महिमा कौल यांचा राजीनामा ट्विटरसाठी नुकसान आहे, परंतु पाच वर्षांच्या आपल्या कामानंतर जवळच्या आणि कौटुंबिक नात्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या त्यांच्या इच्छेचा आदर करतो, असं ट्विटरने म्हटलं.

Mahima Kaul with her friend

ट्विटरसाठी भारत तिसर्‍या क्रमांकाचं मार्केट आहे. अमेरिका आणि जपान अनुक्रमे पहिले आणि द्वितीय क्रमांकावर आहेत. भारतात ट्विटरचे कोट्यवधी यूजर्स आहेत, ज्यामध्ये अभिनेते, खेळाडू, सरकारी अधिकारी, राजकारणी आणि इतर व्यक्तींचा समावेश आहे. ३० जानेवारीला #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगचा वापर करणाऱ्या सर्व अकाऊंटवर ही कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशाचे पालन करण्यात न झाल्याने सरकारने नाराजी व्यक्त केली होती. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेच्या कामात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहेत. शेतकरी आंदोलना दरम्यान #ModiPlanningFarmerGenocide या हॅशटॅगशी संबंधित सर्व मजकूर हटवण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले होते. केंद्र सरकारच्या आदेशाचे पालन केले नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा देखील केंद्र सरकारने ट्विटरला दिला आहे. या संदर्भात सरकारने नोटिस देखील बजावली आहे.

ट्वीटरच्या भारतातील पब्लिक पॉलिसी हेड महिमा कौल यांनी राजीनामा दिला आहे. महिमा कौल मार्च अखेरपर्यंत ट्विटरसोबत काम करतील आणि त्यांची जबाबदारी निभावतील, असं ट्विटरने म्हटलं आहे. महिमा कौल आपल्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत, असंही ट्विटरने सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments