Friday, February 26, 2021
Home International News ग्रेटा थनबर्गचे टूलकीट.. काय आहे प्रकरण !

ग्रेटा थनबर्गचे टूलकीट.. काय आहे प्रकरण !

दिल्ली सीमाभागात झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिस सोशल मीडियावर करडी नजर ठेऊन आहे. आतापर्यंत पोलिसांनी ३०० सोशल मीडिया हँडल निलंबित केले आहे. यात ग्रेटाने अपलोड केलेल्या टूलकिट वर नजर ठेवली जात आहे. या टूलकिटच्या माध्यमातून वातावरण बिघडवण्याचा कट रचला जात होता. भारत सरकारची प्रतिमा खराब करण्याचा डाव होता. याबाबत दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कलम १२४ ए (राजद्रोह), १५३ ए, १५३ आणि १२० बी अंतर्गत फिर्याद दाखल केली. एफआयआरमध्ये ग्रेटाचे नाव लिहिलेले नाही, आम्ही तिच्या ट्विट आणि टूलकिटवर गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास करत आहोत. दिल्ली पोलिसांचे सायबर सेल याचा तपास करत आहे.

रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत.” ज्यांना मदत हवी आहे, त्यांच्यासाठी टूलकिट शेअर केलं आहे. ग्रेटा थनबर्गला २०१९ मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले होते. ग्रेटा चर्चेत आली होती ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ग्रेटाची शाब्दिक चकमक झाली होती.

टूलकिट म्हणजे नक्क्की आहे तरी काय ? पाहूया थोडक्यात. हे एक प्रकारचे डॉक्युमेंट आहे. सोशल मीडियावर ते शेअर करून शेतकरी आंदोलनासाठी समर्थकांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल याची ही एक मार्गदर्शक तत्वांची एक यादी म्हणता येईल. सोशल मीडियावर आवाहन करताना कोणत्या हॅशटॅगचा वापर करण्यात यावा?  आंदोलन करत असताना काही अडचण आल्यास कुणाशी संपर्क करावा? आंदोलनात काय करावे आणि काय करू नये? या सर्व गोष्टी त्यात समजावून सांगण्यात आल्या आहेत. आंदोलनात सहभाग घेताना कपड्यांमुळे अडचण येणार नाही यासाठी कशा प्रकारचे कपडे घालावे, पोलिसांनी पकडल्यास तुमचे काय अधिकार आहेत?  यासोबतच, हाँगकाँग आणि चीनमध्ये सुद्धा आंदोलन सुरू असताना अशा टूलकिट तयार करण्यात आल्या होत्या.

२०१९ मध्ये तिने संयुक्त राष्ट्र सभेत जलवायु परिवर्तनावर दिलेल्या भाषणातून साऱ्या जगाचे लक्ष वेधले. या भाषणातून तिने जगभरातील बलाढ्या देशांच्या नेत्यांवर थेट टीका केली होती. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनंतर ग्रेटा थनबर्गने पुन्हा आपण भारतातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तसेच कुठल्याही धमकीला घाबरून हा निर्णय बदलणार नाही असे स्पष्ट केले. यानंतर तिने टूलकिट अपडेट करून शेअर केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments