Sunday, March 7, 2021
Home International News २७ वर्ष गोठवलेल्या भ्रूणाने घेतला जन्म

२७ वर्ष गोठवलेल्या भ्रूणाने घेतला जन्म

जगामध्ये आधुनिक तंत्रज्ञान एवढ पुढे गेलेलं आहे कि, कोणत्याही गोष्टी साठी पर्याय उपलब्ध नाही असे होत नाही. जगभरातील शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावत असतात. त्यातील हि एक नवीन संकल्पना. नैसर्गिक रित्या ज्यांना गर्भधारणा होत नाही किंवा शारिरीक व्याधींमुळे मुल जन्माला घालायला जी जोडपी असमर्थ असतात, त्यांच्यासाठी ही बातमी आल्हाददायी आहे.

सर्वाधिक काळासाठी गोठवून ठेवलेल्या भ्रूणाद्वारे जन्म होण्याचा एक वेगळा विक्रम या भ्रूणाद्वारे जन्मलेल्या मॉली बाळाच्या नावावर आता नोंदला गेला आहे. गर्भधारणा करणाऱ्या जोडप्यांनी गर्भधारणेसाठी न वापरता दान केलेले भ्रूण इथे गोठवून ठेवले जातात. विशेष म्हणजे मॉलीची मोठी बहीण एमाच्या नावावर हा विक्रम आतापर्यंत होता. ऑक्टोबर १९९२ मध्ये हे भ्रूण गोठवण्यात आले होते आणि २०२० मध्ये ते वापरण्यात आले. अमेरिकेतल्या टेनेसीमध्ये राहणाऱ्या टीना आणि बेन गिब्सन जोडप्याने हे भ्रूण दत्तक घेतलं. मॉलीच्या जन्मानंतर तिची आई टीना गिब्सन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्या म्हणतात, “मला अजूनही भरून येतं. मला एक नाही दोन लेकी असतील असं मला पाच वर्षांपूर्वी कोणी सांगितलं असतं, तर मी त्याला वेड्यात काढलं असतं.” मूल व्हावं म्हणून टीना आणि बेन गिब्सन पाच वर्षं प्रयत्न करत होते. नेमकी त्याच वेळी टीना यांच्या आई-वडिलांनी स्थानिक वृत्त वाहिनीवर एम्ब्रियो अॅडॉप्शन म्हणजे भ्रूण दत्तक घेण्याविषयीची बातमी पाहिली.

टीना पेशाने प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत तर त्यांचे पती बेन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहेत. टीना सांगतात माझ्या आई-वडिलांनी ती बातमी पाहिली नसती, तर आज आम्ही इथे नसतो. कारण आमची बातमी होणं, हे वर्तुळ पूर्ण होण्यासारखं आहे म्हणूनच जगाला आम्ही आमची गोष्ट सांगतोय. ही बातमी पाहिल्यानंतर या जोडप्याने नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटरशी संपर्क साधला. NEDC चे मार्केटिंग आणि डेव्हलपमेंट डायरेक्टर मार्क मेलिंगर सांगतात, भ्रूण दत्तक घेणाऱ्यांपैकी ९५% जणांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बाळ होण्यात अडचण आलेली असते. या लोकांना त्यांचं कुटुंब वाढवायला आम्ही मदत करू शकतो याचा आम्हाला अभिमान आहे.” गिब्सन दांपत्याने पहिल्यांदा भ्रूण दत्तक घेतल्यानंतर २०१७ मध्ये त्यांची मोठी मुलगी एमाचा जन्म झाला.

Test Tube baby
Photo by Polina Tankilevitch from Pexels

नॉक्सव्हिल परिसरातल्या या ख्रिस्ती समाजसेवी संस्थेमध्ये भ्रूण गोठवून ठेवण्याचं काम केलं जातं. IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेश पद्धतीने उपचार घेत गिब्सन यांच्यासारखी कुटुंबं मग यापैकी एक भ्रूण दत्तक घेत बाळ जन्माला घालू शकतात. या बाळाची जनुकं त्याला जन्माला घालणाऱ्या आईवडिलांपेक्षा वेगळी असतात. अमेरिकेत आताच्या घडीला असे गोठवून ठेवलेले सुमारे १० लाख भ्रूण असल्याची माहिती नॅशनल एम्ब्रियो डोनेशन सेंटर ने दिली आहे. NEDC  ची स्थापना १७ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेतून हजारापेक्षा जास्त जणांनी भ्रूण दत्तक घेतलंय. सध्या दरवर्षी २०० भ्रूण दत्तक घेतली जातात. भ्रूण दान करणाऱ्या कुटुंबाशी संपर्क ठेवायचा की नाही, याचा निर्णय ते दत्तक घेणाऱ्यांना घेता येतो. भ्रूण दत्तक घेण्याची इच्छा असणाऱ्या जोडप्याला २०० ते ३०० दात्यांची प्रोफाईल्स दाखवली जातात. यामध्ये त्यांच्या कुटुंबाची पूर्ण माहिती असते. दीर्घकाळ बाळासाठी आसुसलेल्या गिब्सन जोडप्यासाठी या सर्व बाबींमुळे मनात गोंधळ निर्माण झाला. म्हणून मग त्यांनी NEDC च्या तज्ज्ञांचा सल्ला घेतला. “आधी मूल होत नाही म्हणून रात्री जागून काढल्या होत्या. त्यानंतर आई झाले म्हणून रात्री जागवल्या. पण अशाप्रकारे दमणं हवंहवंसं होतं,” असे टीना आवर्जून सांगतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments