Sunday, February 28, 2021
Home International News आशियातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये मुकेश अंबानींची घसरण

आशियातील श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये मुकेश अंबानींची घसरण

झोंग शानशान हे केवळ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले नाहीत तर त्यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अलिबाबाच्या जॅक मा यांनाही मागे टाकलं आहे. शानशान हे बाटलीबंद पाणी आणि कोरोनावरील लस विकसित करण्याच्या व्यवसायाची जोडले गेले आहेत. झोंग शानशान हे अब्जाधीश असून त्यांची माध्यमांमध्येही फारशी चर्चा झालेली नाही. पत्रकारिता, मशरूमचं उत्पादन, आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम केल्यानंतर आता ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार यावर्षी झोंग यांची संपत्ती वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. यावर्षी त्यांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळेच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याबाबत चीनच्या बाहेर फारच कमी लोकांना माहिती आहे. ६६ वर्षीय झोंग हे अद्यापही राजकारणात उतरले नाहीत. चीनमध्ये त्यांना लोन वुल्फ म्हणूनही ते ओळखले जाते.

zhong shanshan

रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील ५ वे सर्वात श्रीमंत  व्यक्ती बनले आहेत. आधीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये ४.४९ टक्क्यांनी वाढ झालीय. त्यामुळे आता त्यांची संपत्ती ७५ अब्ज डॉलर झालेली आहे. म्हणजे तब्बल ५.६१ लाख कोटी रुपये मुकेश अंबानी यांची संपत्ती आहे. डॉलरची सध्याची किंमत ७४.७६ रुपये आहे. भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी हे आता फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गच्या मागे आहेत. ज्याची एकूण संपत्ती ८९ अब्ज डॉलर आहे. परंतु आता चीनमधील वॉटर किंग म्हणून ओळखले जाणारे व्यावसायिक झोंग शानशान हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. आता अंबानी यांच्या संपत्तीत आणखी वाढ झालेली आहे, ते मागील महिन्यात १० श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे एकमेव आशियातील व्यक्ती होते. बफेट यांची संपत्ती या आठवड्यात कमी झालीय, कारण त्यांनी चॅरिटीसाठी २.९ अब्ज डॉलर दान केले आहेत. यावर्षी त्यांचं नेटवर्थ ७०.९ अब्ज डॉलर्सवरून वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.

शानशान यांना  दोन कारणांमुळे त्यांना मोठं यश मिळाल्याचं म्हटलं जातं. पहिलं म्हणजे त्यांनी एप्रिल महिन्यात बीजिंग वेन्टाई बायोलॉजिकल फार्मसी एन्टरप्राईझ या कंपनीकडून एक लस विकसित केली. दुसरं म्हणजे काही महिन्यांतच बाटलीबंद पाणी विकणारी कंपनी नोंगफू स्प्रिंग ही हाँगकाँगमधील सर्वात लोकप्रिय कंपनी ठरली. नोंगफू कंपनीच्या शेअर्सनंही आपल्या लिस्टींगनंतर १५५ टक्क्यांची उसळी घेतली आणि वेन्टाईच्या शेअर्सनं २००० टक्क्यांपेक्षा अधिक उसळी घेतली.  त्यामुळे मुकेश अंबानींची पहिल्या नंबर वरून घसरण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments