Friday, February 26, 2021
Home Lifestyle News चौकटीबाहेरील आयुष्यही जगून पहावे

चौकटीबाहेरील आयुष्यही जगून पहावे

गेले काही महिने कठीण गेल्यानंतर सगळेच नवीन वर्षाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नवीन वर्ष हे कायम नवीन काहीतरी चांगलचं घेऊन येईल या सकारात्मक विचारानेच. त्यामुळे नियोजनही जोरदार सुरु आहे. सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे याला सिने कलाकारही अपवाद नाही. काही कलाकार निसर्गाच्या जवळ जात सेलिब्रेशन करणार आहेत. तर काही मंडळी घरच्यांसोबत नव्या वर्षाचं स्वागत करणार आहेत. रोजच्या ठरलेल्या चौकटी पेक्षा काहीतरी नवीन आयुष्यात घडावे किंवा करावे असे सर्वांनाच वाटत असते. आपले सेलीब्रीटीही त्याला अपवाद नाहीत. पाहूया काय प्लानींग करत  आहेत नव वर्षाचे.

अभिनेत्री ऋता दुर्गुळेनं सांगितलं, आज वर्षाच्या शेवटच्या दिवशी आमच्या ‘दादा एक गुड न्यूज आहे’  या नाटकाची तालीम आहे. नववर्षात पुन्हा एकदा आम्ही रंगभूमीवर हे नाटक घेऊन येत आहोत. त्यामुळे मी नववर्षाचं स्वागत तालमीनेच करणार आहे. तसंच उद्या नववर्षाच्या पहिल्या दिवशी आगामी वेब सीरिजच्या कामाला प्रारंभ होणार आहे. मी त्याच्या चित्रीकरणात व्यग्र असणार आहे.

trekking

अभिनेता आरोह वेलणकर म्हणतो की, ‘मी सध्या मढमध्ये माझ्या मालिकेचं चित्रीकरण करतोय. पण, आम्हाला नववर्षानिमित्त दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे मी माझं पुण्याचं घर गाठणार आहे. बायकोसोबत कँडल लाइट डिनरचा बेत आखला आहे’.

हेमंत ढोमे सांगतो, यंदा आम्ही काही मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीय नागोठाणे येथील एका फार्महाऊसवर एकत्र जमलो आहोत. चार-पाच दिवस राहण्याचा प्लॅन आहे. घरगुती पद्धतीनं सेलिब्रेशन करणार आहोत. आता पुढचे काही दिवस आम्ही सगळे मिळून स्वयंपाक करणार आहोत. अनेक चविष्ट पदार्थांची रेलचेल असेल. गेम्स खेळणार आहोत. तसंच डबल सेलिब्रेशन आहे. एक म्हणजे नव्या वर्षाचं स्वागत आणि दुसरं म्हणजे क्षितीचा वाढदिवस जो १ जानेवारीला असतो,  तोही इथेच साजरा करणार आहोत. एकंदरच नवीन वर्षाची सुरुवात धमाल असणार आहे.

अभिनेता आशुतोष गोखले म्हणतो, दरवर्षी नव वर्षाचं स्वागत मी आमच्या ‘मिथक मुंबई’ या नाट्यसंस्थेतील रंगकर्मींसोबत करतो. कॉलेजच्या दिवसांमध्ये आम्ही ही संस्था स्थापन केली होती. आज त्यातील सदस्य रंगकर्मी कलाक्षेत्रासह विविध व्यवसायात आहेत. पण, आम्ही नववर्षानिमित्त नेहमी एकत्र येतो. एकमेकांसोबत नववर्षांचं स्वागत करतो. यंदा आम्ही अलिबाग येथे जाणार आहोत. पण, यंदाचं सेलिब्रेशन फार मोठं नसणार आहे. आपल्यावरील कोरोनाचं संकट अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही. त्यामुळे सुरक्षिततेची काळजी घेत छोटेखानी कार्यक्रमच आम्ही करणार आहोत.  यावेळी आशुतोष बरोबर त्याचा मित्र अभिनेता अद्वैत दादरकर देखील असणार आहे.

love in the air

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांना नववर्षानिमित्त सुट्टी देण्यात आली आहे. आई कुठे काय करते, सहकुटुंब सहपरिवार, रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं, फुलाला सुगंध मातीचा, देवमाणूस, कारभारी लयभारी, डॉक्टर डॉन आणि सुखी माणसाचा सदरा  या मालिकांना सुट्टी आहे. त्यामुळे मालिकेतील काही कलाकार घरी तर काही जण मुंबईजवळच शॉर्ट ट्रिप करत नववर्षाचं सेलिब्रेशन करणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments