Thursday, February 25, 2021
Home Lifestyle News नात्यातील श्वासोच्छवास - संवाद

नात्यातील श्वासोच्छवास – संवाद

जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्यामुळे कोणत्याही नात्यामध्ये सहजता येण्यासाठी त्याचप्रमाणे नात्यांची वीण घट्ट होण्यासाठी प्रत्येकाला त्याच्या  स्वभावाप्रमाणे समजून घेणे जरुरीचे असते. कोणतेही नाते जबरदस्तीने जुळून येत नाही. त्यासाठी लागते नात्यात असणारी सहजता. जेवढे त्याला हळुवारपणे जपण्यात येईल तितकेच ते दृढ होत जाते. काही लोकांना प्रेम म्हणजे कथा व सिनेमात दाखवलं जातं त्याप्रमाणे वाटतं. त्यामुळे कोणाच्या प्रेमात पडण्याआधी ती व्यक्ती जशी आहे तशी स्वीकारणे अत्यंत गरजेचं असतं. पूर्वापार चालत आलेल्या प्रेम कहाण्या रोमियो-जूलियट, हिर-रांझा अशा कित्येक प्रेमकहाण्या आहेत ज्यांना कधीच विसरता येणार नाही, कारण त्यांच्या प्रेमाची नोंद इतिहासजमा आहे. पण सर्वांचीच प्रेमकहाणी एकसारखी नसते. काहींची प्रेमकहाणी एकदम शांत आणि हळूवार असते तर अनेकांना लग्नापर्यंतचा प्रवास पार पाडताना अनेक संकटे व आव्हानांचा सामना करावा लागतो.

प्रेमात पडण्याची इच्छा तर सर्वांनाच असते पण प्रेमात पडल्यानंतर मात्र ते नातं निभावणं म्हणजे तारेवरची कसरत आहे हे हळूहळू  सर्वच कपल्सच्या लक्षात येते. प्रेम करणं व नात्याची अखेरपर्यंत जपणूक करून नातं हसतं खेळतं ठेवणं तितकं सोपं नसतं जितकं ते सिनेमा व मालिकांमधील आभासी दुनियेत दाखवले जाते. भले मग ते नाते मित्र- मैत्रिणीच , प्रियकर-प्रेयसीचं असो वा पती-पत्नीचं असो. नातं “हेल्दी” ठेवण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. जसा आपण आपल्या मनाचा विचार पहिला करतो तसेच समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार पहिला मनात येणे म्हणजेचं प्रेम. नात्याला जिवंत ठेवण्यासाठी नात्यामध्ये “संवाद” असणं अतिशय गरजेचे आहे. तशी आत्ता बरीच माध्यम पण उपलब्ध आहेत. मेसेज, कॉल, भेटणं, वॉट्सअॅप मेसेज, व्हिडीओ कॉल यापैकी माध्यम कोणतंही असो पण संवाद कायम राहणं गरजेचं असतं. संवाद असला की वाद नाहीसे होतात, मुख्य म्हणजे गैरसमजांना नात्यात थारा राहत नाही. संवादामार्फत जोडपी आपल्या भावना एकमेकांसमोर मांडू शकतात. जेव्हा दोन्ही व्यक्तींना एकमेकांची परिस्थिती व भावना माहित असतील तेव्हा नात्यातील सहजता आणि समजुतदारी अधिक वाढते. जसे म्हणतात ना एकाला ठेच लागली कि दुसर्याच्या डोळ्यात पाणी येते अगदी तितकेचं सहज.

हल्ली विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबत मैत्री करणं, फोनवर बोलणं, फिरायला जाणं किंवा मग सोशल मीडियावर जोडलं जाणं साधारण गोष्ट आहे. पण या गोष्टी बहुतांश वेळा विश्वासाच्या आड येतात. यामुळे सर्वात गरजेचं असतं की नात्यात असणा-या दोघांनी एकमेकांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल असुरक्षित वाटत असेल तर ती आपल्या जोडीदाराजवळ व्यक्त करा. तसंच आपल्या जोडीदाराला कोणत्या गोष्टीवरून असुरक्षित वाटत असेल तर याची चेष्टा करण्यापेक्षा त्याच्या मनातील असुरक्षितता व नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करा. जेणे करुन नात्यातील विश्वास अधिक घट्ट होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments