Monday, March 1, 2021
Home Lifestyle News नृत्य.. एक अभिव्यक्ती साधना

नृत्य.. एक अभिव्यक्ती साधना

नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. नृत्यातून आपण न बोलताही आपली भावना व्यक्त करू शकतो.

मनाला आलेले नैराश्य, मरगळ किंवा शरीराला आलेली शिथिलता दूर करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे नृत्य. नृत्याबरोबर जर संगीताची जोड असेल तर खूपच आल्हाददायी. नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. नृत्यातून आपण न बोलताही आपली भावना व्यक्त करू शकतो. आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर थकवा घालवण्यासाठी संध्याकाळी एकत्र येऊन नृत्याने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला असावा. नृत्य प्रकार हे विविध प्रकारचे असतात. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले. ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.

सध्या डान्स वर्कआऊट दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग झालाय. झुम्बा किंवा बॉलिवूड डान्स यांचा समावेश व्यायामात करणं हे आपल्यासाठी नवीन नाही. गेले काही महिने लॉकडाऊन असल्याने लोकांचा शारीरिक तंदुरुस्तीकडे कल वाढत चाललेला आहे. शिवाय, नवनवीन नृत्याचे व्यायामप्रकार शोधण्यासाठी लोक सोशल मीडियाची मदत घेत आहेत. लॉकडाउन दरम्यान सोशल मीडियावर शफल डान्स आणि हुपिंग हे नृत्यप्रकार प्रचंड व्हायरल झाले. पाहूया काय आहेत हे प्रकार.

zumba dance
Zumba Dance – Stress Buster

सध्या तरुण मंडळी हूपिंगकडे आकर्षित होत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये हूपिंग चॅलेंजची चर्चा पाहायला मिळाली. त्यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची आवश्यकता नसते. हूपिंगसाठी लागणारी लवचीकता प्राप्त करण्यासाठी सराव हा एकमेव मार्ग असल्याचं तज्ज्ञ नमूद करतात. हूपिंग हा एक खेळण्याचा प्रकार असल्यामुळे शरीराची हालचाल होण्यासही मदत मिळते. यासाठी सर्वात आधी एक हूप आणि सुटसुटीत कपड्यांची निवड करा. हूपचा आकार तुमच्या सोयीनुसार निवडावा. सुरुवातीला ३६ इंचाची हूप रिंग खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. बाजारात ३० ते ४२ इंचाच्या हूपिंग रिंग्स उपलब्ध असतात. तुमच्या आवडीप्रमाणे विकत घ्या. हूपिंग करताना पायात ठरावीक प्रकारच्या चपला घालण्याचा नियम नाही. लॉकडाउनमध्ये अनेकांनी हूपिंग व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर केले आणि मित्रमंडळींना चॅलेंजही दिलं. सुरुवातीचे काही आठवडे सराव करताना अडथळे येऊ शकतात.

couple dance
Ballet Dance

लॉकडाउनच्या काळात स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. या दरम्यान सोशल मीडियावर बऱ्याच चॅलेंजेसचा पूर आला होता. जगभरातील लोकांकडून चॅलेंजना भरभरून प्रतिसाद मिळाला. विशेषतः स्टेअर शफल चॅलेंज भरपूर व्हायरल झालं. दिसायला थोडं कठीण वाटलं तरीही कित्येक मंडळींनी ते स्वीकारलं. हा नृत्यप्रकार मूळचा ऑस्ट्रेलियातील असून याला मेलबर्न शफल असंही म्हटलं जातं. जगभरातील इडीएम फेस्टिव्हल्समध्ये केल्या जाणाऱ्या डान्सचं चॅलेंज स्वीकारून मनोरंजन झाल्याचं बरेच जण सांगतात. शफल डान्स शिकण्यासाठी युट्यूबची मदत घेतली गेली. शफल डान्स चॅलेंजनं नृत्य न येणाऱ्या लोकांनाही थिरकायला लावलं. शफल डान्स केवळ मनोरंजनासोबतच कॅलरीज घटवण्यासाठीसुद्धा मदत करतं. शफल डान्समुळे हात आणि पायाचा उत्तम व्यायाम होतो आणि स्नायूंना बळकटी येते, असं तज्ज्ञ सांगतात. शफल डान्समुळे दर तासाला ५०० ते १५०० कॅलरीज आरामात घटवू शकता. जसे फायदे तसे तोटेही असतातच. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाइटचं. शफल डान्स करताना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासाठी काही ठरावीक बाबी लक्षात असणं आवश्यक आहे.डान्स करण्याआधी त्याबद्दल माहिती घ्या, सराव करा आणि मगच प्रात्यक्षिक करा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments