Friday, February 26, 2021
Home Lifestyle News डीजीटल स्क्रीन आणि डोळ्यांच्या समस्या

डीजीटल स्क्रीन आणि डोळ्यांच्या समस्या

मोबाईल आणि संगणकच्या डिजिटल स्क्रीनचा वापर करण्याचे प्रमाण कामावर व घरी वाढल्याने गेल्या काही वर्षांत दृष्टीदोषाचे प्रमाणही वाढत चालले आहे. संगणक व मोबाईलकडे पाहण्याचा कालावधी वाढल्याने डोळ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. यामध्ये डोळे थकणे व डोकेदुखी इथ पासून डोळे कोरडे पडणे, धुसर दृष्टी, दुहेरी दृष्टी, डोळे खाजणे, डोळ्यांत काही कालावधी नंतर पाणी यायला लागणे अशा काही गंभीर समस्यांचा समावेश आहे. ऑफिसला जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या डोळ्यांची चांगली काळजी कशी घ्यावी व डोळ्यांची योग्य ती स्वच्छता कशी राखावी, हे समजण्यास मदत होते. नुकत्याच सादर झालेल्या एका अभ्यासानुसार, कार्यालयीन कर्मचारी दिवसाकाठी किमान ६ तास संगणकाच्या स्क्रीनकडे पाहात असतात. ६५ टक्के लोकांमध्ये डोळ्यांवर ताण येणे व दृष्टीदोष या समस्या असल्याचे आढळून आले, तर ४७% जणांना डोकेदुखी व थकवा हे त्रास जाणवत असल्याचे त्यामध्ये निदर्शनास आले.

eye issue due to mobile

भारतीय नागरिक स्क्रीनकडे अति प्रमाणात पाहात असतात, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. ७० टक्के कर्मचारी दिवसातील ६ ते ९ तास आपल्या गॅझेट्सच्या स्क्रीनकडे पाहात असतात, असे त्यात म्हटले आहे. त्याचप्रमाणे, भारतीय कार्यालयांमध्ये ६८ टक्के वर्कस्टेशन्समधील संगणकांच्या स्क्रीनमधून येणारा उजेड हा अयोग्य असतो. त्यांतील ५८ टक्के स्क्रीनमधील उजेड अपुरा आणि ४२ टक्के स्क्रीनमधील उजेड खूपच जास्त अशा प्रमाणात असतो, असे दिसून आले आहे. प्रिंट झालेला, हाताने लिहिलेला किंवा संगणकाच्या स्क्रीनवर उमटलेला मजकूर वाचण्यासाठी योग्य स्वरुपात उजेडाची आवश्यकता असते, जेणेकरून मजकूर नीट दिसू शकेल. खोलीत अती उजेड असेल किंवा अगदी कमी असेल तर मोठ्या आकाराच्या,  उघड्या खिडक्या असतील किंवा छतावर लावलेली प्रकाश व्यवस्था असेल, तर डिजिटल स्क्रीनवरील मजकूर दिसण्यात अडचण येते.

वर्कस्टेशनचे अर्गोनॉमिक्स हे देखील सीव्हीएस (कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम) निर्माण होण्याचे कारण असते. मॉनिटर चुकीच्या पद्धतीने ठेवलेला असेल,  तर मानेची ठेवण बदलते आणि त्यातून मान, पाठीचा वरचा भाग व खांदा, स्नायूंची दुखणी सुरू होतात. गॅझेटच्या स्क्रीनकडे बराच वेळ पाहात राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व स्वास्थ्यावर शारिरीक व मानसिक स्वरुपाचा परिणाम होतो. कार्यालयांमध्ये संगणक सतत वापरणाऱ्यांच्या डोळ्यांचे आरोग्य नीट राखण्यासाठी,  व्यापक स्वरुपाची कर्मचारी स्वास्थ्य मार्गदर्शक तत्वे आखणे गरजेचे आहे. योग्य सवयींविषयी प्रशिक्षण देणे, वर्कस्टेशन्सची व्यवस्था सुधारणे आणि कामाच्या अनुषंगाने डिजिटल स्वच्छता राखणे या गोष्टीही केल्या पाहिजेत. त्याचबरोबर, शारिरीक व मानसिक ताण कमी करून फिटनेस कसा मिळवायचा, याचे प्रशिक्षण दिल्यास, कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर येणारा ताण व थकवा दूर करता येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments