Thursday, February 25, 2021
Home Lifestyle News टाकाऊ पासून टिकाऊ

टाकाऊ पासून टिकाऊ

जुन्या वस्तू वापरून अनेक शोभेच्या वस्तू तयार करून घराच्या सौंदर्यात भर घालता येते. अशा असंख्य घरगुती वस्तू आहेत,  ज्यांचा उपयोग करून शिल्प, कुशन्स, पेण्टेड फर्निचर, हँगिंग लॅम्प्स, शेल्व्हज्, वॉल आर्ट इत्यादी वस्तू बनवता येतात.  बरेचदा घरातली जागा व्यापलेल्या अनेक वस्तू आधीच घरात असतात. मग नवीन वस्तू जुन्याची जागा घेते. पण जुन्या वस्तू घरातच राहतात. त्या काही घराबाहेर जात नाहीत.  मुळात माणसाला वस्तू जमा करण्याची सवयच असते. म्हणूनच आपण बरेचदा एखाद्या वस्तूची गरज संपली तरी ती घरात जपून ठेवतो. तरीही इंटिरिअर डिझायनर्स जुन्या वस्तूंचा उपयोग करून त्या घर सजावटीसाठी वापरतात. प्रत्येकाच्या घरात वापरात नसलेल्या अनेक वस्तू असतात. पण त्यांचा उपयोग इंटिरिअरमध्ये होऊ शकतो, असा विचारही आपण कधी केला नसेल.

पेपर, स्फटिक, अॅक्रेलिक पेण्ट्स, कपड्यांचे तुकडे, तुटलेले आरसे, स्प्रे पेण्ट्स, नॉर्मल सिरॅमिक प्लेट्स इत्यादी वस्तूचा आपण सहज आणि सुंदर पद्धतीने वापर करू शकतो. घरात कमी वापरात असलेल्या अन्य वस्तूही भिंतीवर शिडीसारख्या लावता येतात. त्यांची विविध पद्धतीने रचनात्मक मांडणी करून त्याचा डेकोरेटीव्ह प्रॉडक्ट म्हणून वापर करता येतो. भिंतीवरच्या अशा प्रकारच्या रचनेत शिडी ब्रेक करता येते. दोन भागात अशा वस्तू बुक शेल्फसारख्या लावता येतात.

कच‍ऱ्याचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणा‍‍ऱ्या समस्या रोखण्यासाठी आपण आपल्या घरातूनही हातभार लावू शकतो. आपल्या घरात निर्माण होणा‍‍ऱ्या कच‍ऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी टाकाऊपासुन टिकाऊचा पर्याय अधिक कल्पकपणे अवलंबून आपणही कचरामुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकू शकतो. त्यामुळे कच‍ऱ्यात जाणा‍ऱ्या अनेक वस्तूंचा पुनर्वापर होऊ शकेल. घरातील शीतपेयांच्या मोठ्या बाटल्या, जुन्या खराब झालेल्या सीडी, आइस्क्रिम स्टिक्स या सरसकट कचऱ्यात टाकण्यापेक्षा त्यांचा अधिक चांगला उपयोग कसा करता येईल,  याचा विचार करणे आवश्यक झाले आहे. झाडे लावण्यासाठी तुटलेल्या बादल्यांपासून सिमेंटच्या पोत्यांपर्यंत अनेक गोष्टींचा वापर शक्य आहे. त्याचबरोबर जुन्या टी-शर्ट, जीन्सपासून बॅगा बनवणे,  बाटल्यांचा उपयोग करून पिशव्यांची हवाबंद झाकणे बनवणे,  सुशोभनाच्या वस्तू तयार करणे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

सक्षम महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ.श्वेता मोहिते यांच्या माध्यमातून कापडी पिशव्या बनविण्यात आल्या आहेत. नागरिकांना परवडतील अशा वाजवी भावात असून या कापडी पिशव्या पाच रुपये प्रति पिशवी या दराने देण्यात येत आहेत. सक्षम महिला बचत गटाच्या सदस्यांनी रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले, दुकानदार आणि नागरिक यांना या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. टाकाऊ ते विकाऊ ही संकल्पना घेऊन सक्षम महिला बचत गटाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये परिवर्तन घडविण्याचे कार्य सौ श्वेता मोहिते व त्यांच्या सहकारी मंडळी करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments