रोजच्या जीवनात थोडेसे केलेले बदल नक्कीच निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त ठरतील. सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणेच कठीण झाले आहेत. ऑफिस आणि घर या मध्येच सगळा वेळ निघून जातो आहे. काही आरोग्याचे टिप्स आहेत ज्या मुळे आपण जाणून घेऊ शकाल की आपण किती तंदुरुस्त किंवा फिट आहात. आज माणसाचं आरोग्य खालावलं आहे त्यामुळे त्याला काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. काही छोट्या-छोट्या गोष्टी जरी आपण लक्ष देऊन केली तरी आरोग्य हे चांगलं राहू शकतं. अगदी सोप्या गोष्टी आहेत परंतु, त्याचे कायम अवलोकन करणे गरजेचे आहे.
आहारात ताज्या भाज्यांचा आणि फळांचा उपयोग करा. जास्त काळापासून असणारे पदार्थ खाणे टाळा.
झोपण्याचे ठिकाण स्वच्छ ठेवा. घरात हवा खेळती असू द्या. गादी, चादर यांना ऊन दाखवा.
मेडिशन, योगा किंवा ध्यान यासारख्या गोष्टी करा. तणाव पासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. दररोज कमीत कमी याला ३० मिनिटं द्या.
बाहेरून घरी आल्यानंतर जेवन बनवण्याच्या आधी किंवा जेवनापूर्वी, बाथरूममधून आल्यानंतर हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात लहान बाळ असेल तर त्याला घेण्याआधी हाथ धुणे गरजेचे आहे.
घरात साफ-सफाईवर ध्यान द्या. स्वयंपाक घर खासकरून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगवेगळे ठेवा.
तेल आणि मसाले यांच्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो टाळा. जेवनाला योग्य तापमानात शिजवून घेणे गरजेचे आहे.
स्वयंपाकामध्येही तुपाचा समावेश केल्यास पचनसंस्था निरोगी राहण्यास आणि शरीराला पोषण तत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळते.
तुपाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास शरीरातील वाताची समस्या नियंत्रणात येऊन गॅसेसचा त्रास देखील कमी होण्यास मदत मिळते. यामुळे अॅसिडिटीची समस्याही दूर होण्यास मदत मिळते.
दररोज किमान १० – १२ ग्लास पाणी आवर्जून प्यावं. जेवण्याबरोबर पाणी पिणं नुकसानदायी होऊ शकत. जेवण्याच्या अर्ध्यातासापूर्वी १ ग्लास पाणी पिणं फायदेकारक आहे. या मुळे आपण जेवण कमी प्रमाणात घेतो. जेवण्याच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्यावं.
वयाच्या ४० वर्षानंतर नियमित चेकअप करा. औषध दिली असतील तर नियमित घ्या. त्यामध्ये अडथळा येऊ देणं टाळा. मनोरंजनाच्या गोष्टी करा. आपण नियमितपणे व्यायाम करता तर आपण स्वतःला अधिक सक्रिय अनुभवता. कमी आळस येणं आणि कमी झोप येणं देखील निरोगी आणि तंदुरुस्त असण्याची लक्षणे आहेत.