Friday, February 26, 2021
Home Lifestyle News सोन्याच्या पाऊलाने येउदे २०२१

सोन्याच्या पाऊलाने येउदे २०२१

भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. राज्यात ३ मे २०२० पर्यंत १२,९७४ जणांना याची लागण झाली असून त्यापैकी ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि २,११५ जण पूर्ण बरे झालेले आहेत. एकूण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी ४% लोकांचा मृत्यू झाला आहे.    

या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यात काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. ११ मार्च २०२० पासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या. १३ मार्च रोजी,  महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला. राज्यात जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले. २२ मार्च पासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या. २३ मार्चला जमावबंदीने फरक पडत नसल्याचे पाहून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे, धार्मिक संस्था बंद करण्यात आल्या. देशातील विमानतळे बंद करण्याचा संबंधित अधिकार पंतप्रधानांना असल्याने सर्व विमानतळे त्वरित बंद करण्याची विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.

महाराष्ट्रातील जन जीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमांनुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. नागरिकांची उपासमार होऊ नये, अन्नधान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर तीन महिन्यांचे रेशन देण्याचा निर्णय झाला. २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणारी विमानसेवाही बंद करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करूनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरू नये या साठी पोलिस यंत्रणा झगडत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात गर्क आहे. २०२० मध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. लाखो लोकांचा जीव गेला. लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक फटका बसला. वर्षाअखेर होईपर्यंत विविध कंपन्यांच्या लशी उपलब्ध झाल्या. अनेक देशांमध्ये त्याला मंजुरी मिळून पहिल्या फळीतले वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, वृद्ध यांचं लसीकरण सुरू होणार इतक्यात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने ब्रिटनमध्ये खळबळ माजवली आहे. त्यामुळे ब्रिटनवरून येणाऱ्या विमानांवर बहुतांश देशांकडून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या स्ट्रेनवर कशा प्रकारे आळा मिळवला जातो, यावर पुढच्या वर्षातील आपली वाटचाल अवलंबून असेल. सध्यातरी आपण नव्या स्ट्रेनने घाबरण्याची गरज नाही, असंच तज्ज्ञांचं मत आहे.  

२०२० मध्ये आलेला कोरोना व्हायरस आणि त्यानंतर घडलेल्या अनेक अनपेक्षित घटनांमुळे आपल्या आयुष्यात २०२१ हे वर्ष महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या वर्षात अपूर्ण राहिलेले एखादे काम पूर्ण करण्यासाठी, विस्कटलेली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी किंवा २०२० ने आयुष्यात निर्माण केलेली एखादी पोकळी भरून काढण्यासाठी २०२१ या वर्षात आपल्याला कठोर मेहनत घ्यावी लागणार, हे निश्चित आहे. दुसरीकडे, जानेवारी महिन्यात सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली जाणार आहोत. भारतानेही लसीकरणासाठी नियमावली जाहीर केलेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व स्तरातील नागरिकांना लस उपलब्ध होणार असल्याची ग्वाही दिली आहे. लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन देश कोरोनामुक्त होऊदे हीच देवाकडे प्रार्थना. येणारे २०२१ वर्ष सोन्याच्या पाऊलाने येउदे. नवीन वर्षाच्या सर्वाना मराठी न्यूज कडून भरभरून शुभेच्छा. Stay Safe, Stay Alert.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments