Friday, February 26, 2021
Home Lifestyle News मिठी दिवस !

मिठी दिवस !

व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेक लोक एकमेकांवर प्रेम व्यक्त करत असतात. व्हॅलेंटाईन वीकमधला सहावा दिवस अर्थात १२ फेब्रुवारी ‘हग डे’ अर्थात ‘मिठी मारण्याचा दिवस’ म्हणून साजरा करतात. मिठी मारून तुम्ही केवळ तुमची नाराजी दूर करत नाही, तर आरोग्यासाठीही हग करणे खूप फायदेशीर आहे. मिठी मारणे हॅपी हार्मोन ऑक्सीटॉसिनच्या वाढीस कारणीभूत ठरते, ज्यामुळे रक्तदाब नॉर्मल होतो आणि हृदयाची गती सामान्य होते. यामुळे व्यक्तीचा मूड बदलतो आणि तणावानंतरच्या तक्रारी दूर करण्यात मदत होते. ताण तणावामुळे आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. अशा परिस्थितीत तणाव कमी केल्याने बर्‍याच प्रकारचे आजार टाळता येतात. ज्यांना आपल्या प्रियजनांकडून जास्त जादू की झप्पी मिळते त्यांना अधिक मानसिक आधार मिळतो आणि त्यांना आजार होण्याची शक्यता देखील कमी असते. त्याच वेळी, आजारी असताना, हा आधार लवकर बरे होण्यासाठी देखील मदत करतो.

hug day

जेव्हा जीवनात दुःखाचे क्षण असतात, तेव्हा जोडीदाराची सर्वात जास्त आवश्यकता जाणवते. त्याच्या एका मिठीमुळे दु:खाशी लढण्याची क्षमता दुपटीने वाढते. आयुष्यातील समस्यांमुळे ताणतणाव येणे देखील अशावेळी कमी होते. तणाव कमी करून अनेक प्रकारचे आजार टाळता येतात. प्रत्येक परिस्थितीत एकमेकांसाठी असण्याचा अर्थ म्हणजे प्रेमाने जवळ घेऊन घेतलेली मिठी आहे. जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपल्या शरीरातून बरेच हार्मोन्स बाहेर पडतात,  जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. असे केल्याने आपण प्रेम व्यक्त करतो, आपला प्रेम आणि विश्वास पूर्वीपेक्षा अधिक वाढतो. त्यातून आनंदही मिळतो. ताणतणाव कमी होतो प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना आधार देणे प्रेमास अधिक बळकट करते.

grandfather hug

एखादा मित्र किंवा एखादी मैत्रीण बऱ्याच दिवसांनी भेटल्यानंतर आनंदाच्या भरात लगेचच मिठी मारली जाते. आनंद, दु:ख किंवा अशाच कोणत्याही भावनेला व्यक्त करण्यासाठी आपल्या मनाच्या जवळ असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हमखास मिठी मारली जाते. अगदी सहजपणे मारली जाणारी ही मिठी, म्हणजे जणू अनेकदा आपल्याला लाभदायकही ठरते. प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे सुख नाही. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास नक्कीच वाढतो. तसंही प्रेमानं मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसांची गरज नसते, पण आजचा दिवस तसा खासच आहे. वॅलेंटाईन वीक मधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे ‘हग डे’, जो सर्व प्रकारच्या नात्यात गोडवा निर्माण करू शकतो. प्रत्येक वर्षाच्या १२ फेब्रुवारीला ‘हग डे’ साजरा करण्यात येतो. मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातील जादूची झप्पी आपण पाहिलीच आहे. त्यावरुन एका मिठीत किती ताकत असते याचा अंदाज नक्कीच येतो.

पूर्वीचा लेखव्हॅलेंटाईन वीक
पुढील लेखदे मजसी वचन तू…

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments