Monday, March 1, 2021
Home Lifestyle News मकरसंक्रांत आणि तिळाचे महत्व

मकरसंक्रांत आणि तिळाचे महत्व

पौष महिन्यात जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो आणि त्याचा मकर राशीत प्रवेश होतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून मंगलकार्यांना सुरुवात होते. नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सं म्हणजे मकर संक्रांत. पवित्र नदीत स्नान करण्यापासून ते दान करण्याचेही यादिवशी विशेष महत्व आहे. यादिवशी तिळाचे दान केल्याने सर्वात मोठे पुण्य मिळते. यादिवशी तिळाच्या दानासोबतच तिळाच्या पाण्याने स्नान, तिळाला स्पर्श करणे आणि खाणेही आवश्यक असते. यावरून तिळाच्या महतीचा अंदाज येऊ शकतो.

Makar Sankranti and Tilgul

तिळाचे दान केल्याने सूर्य आणि शनी हे दोघेही प्रसन्न होतात, कारण ही या दोघांचीही आवडती गोष्ट आहे. मकर संक्रांतीला तिळाचे दान केल्याने राहू आणि शनिदोष दूर होतात, असे पूर्वापार समजले जाते. तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूच्या शरीरातून झाली होती, त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्व आणखी वाढते. सूर्यासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूचीही पूजा केली जाते.

मकरसंक्रांतीची पौराणिक कथा पाहूया

श्रीमद्भागवतानुसार सूर्याच्या दोन पत्नी होत्या – छाया आणि संज्ञा. छायाच्या पुत्राचे नाव होते शनिदेव आणि संज्ञाच्या पुत्राचे नाव होते यमराज. सूर्य आणि शनीमध्ये एकदा वितुष्ट आले कारण शनीने सूर्याला त्यांच्यात भेदभाव करताना पाहिले होते. यामुळे संतापून तो आपल्या आईसह सूर्याच्या घराबाहेर निघून गेला. निघताना छायाने आपल्या पतीला म्हणजेच सूर्यदेवाला शाप दिला की त्यांना कुष्ठरोग होईल. शाप खरा ठरला. तेव्हा त्यांच्या मुलाला यमाला त्याचे कष्ट पाहावले नाहीत. त्याने कठीण तप करून त्याला या रोगातून मुक्त केले. सूर्य आपला मुलगा शनीवर इतका नाराज होता की त्याने त्याचे घर म्हणजेच कुंभ जाळून टाकले. कुंभ ही शनीची रास मानली जाते. घर जळून गेल्याने शनी आणि त्याच्या आईला कष्ट भोगावे लागले. यामुळे यम खूप त्रस्त झाला आणि त्याने आपल्या वडिलांना म्हणजे सूर्याला बरेच समजावले. यानंतर जेव्हा सूर्यदेव शनीच्या घरी म्हणजेच कुंभात पोहोचला तेव्हा ते कुंभ पूर्णपणे जळून गेले होते. शनीने त्याचे स्वागत करण्यासाठी घरात शिल्लक असलेले तिळाचे तेलच वापरले. ज्यादिवशी सूर्य शनीच्या घरी आला तोच दिवस म्हणजे ही मकरसंक्रांत. शनीच्या पूजेमुळे प्रसन्न होऊन सूर्याने शनीला आशीर्वाद दिला की शनीचे दुसरे घर असलेली मकर रास धनधान्याने भरून जाईल. तिळामुळे शनीला त्याचे वैभव परत मिळाले त्यामुळे तीळ ते त्याला प्रिय झाले आणि यादिवशी शनी आणि सूर्याची पूजा करण्याची प्रथा पडली. अशा विविध कथा पूर्वापार चालत आलेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments