Friday, February 26, 2021
Home Lifestyle News योग्य वेळी थांबलंच पाहिजे – एक उत्तम उदाहरण एम. एस. धोनी

योग्य वेळी थांबलंच पाहिजे – एक उत्तम उदाहरण एम. एस. धोनी

सक्रिय आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून धोनीनं निवृत्ती घेतली असली तरीही त्याच्या नावाभोवती असणारं वलय आणि क्रीडारसिकांच्या मनात असणारं त्याचं स्थान आजही अबाधित आहे. भारतीय क्रिकेट संघाचा एका उंचीवर नेऊन ठेवण्याचं श्रेय हे संघातील खेळाडूंसोबतच संघाच्या नेतृत्वालाही दिलं जातं. ज्यामध्ये येणाऱ्या नावांमध्ये अर्थातच महेंद्र सिंह धोनी याचं नाव येतंच. माही, कॅप्टन कूल, धोनी अशा टोपण नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या खेळाडूने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा अलविदा केला. ज्या प्रमाणे धोनी मैदानावर कधी कोणता निर्णय घेईल याचा नेम नसायचा तसाच त्याचा हा निर्णय देखील होता. धोनीची कोणतीही गोष्ट नॉर्मल नव्हती. त्याची विकेट किपींग, त्याची हेअर स्टाइल, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, फिटनेस, कोणत्याही परिस्थितीत डोक शांत ठेवण्याची क्षमता, डीएसआरएल घेण्याची निर्णय असो या सर्व गोष्टीत धोनी वेगळा होता. क्रिकेटमध्ये मिळून धोनीच्या नावावर १७ हजार धावा आहेत. टी-२०, वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा तो पहिला कर्णधार आहे.

पण, माही निवृत्तीनंतर नेमका करणार तरी काय, असाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे..!  क्रिकेटचं मैदान गाजवणारा हाच माही आता खऱ्या अर्थानं अनेकांची भूक भागवत अनोख्या मार्गानं सर्वांचीच मनं जिंकत आहे. माहीनं मात्र त्याच्या निवृत्तीनंतरच्या जीवनाचा बेत फार आधीच आखल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे विविध जाहिरातींसाठी काम करण्याचं धोनीचे सत्र सुरु असतानाच त्यानं कुक्कुटपालन व्यवसायात उडी घेतली. मागील वर्षी रांची येथील फार्महाऊसवर त्यानं जवळपास २ हजार कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांचे पालन करण्याचा निर्णय घेतला. आता हाच माही भाज्यांची निर्यात करण्याचा व्यवसायही सुरु करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रांची येथीस सँबो गावी असणाऱ्या रिंग रोड परिसरात धोनीचे फार्महाऊस ४३ एकर भूखंडावर उभं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तिथं तो कोबी, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, फरसबी आणि इतरही भाज्यांची लागवड जवळपास १० एकरांच्या भूखंडावर करत आहे. रांचीच्या स्थानिक बाजारपेठेत त्याच्या शेतातील कोबी आणि टोमॅटोला चांगली मागणी असल्याचं म्हटलं जात आहे.

रांचीतील बाजारपेठेत धोनीच्या शेतात उगवलेल्या सेंद्रीय भाज्यांची विक्री सुरु झाली असून, त्याला चांगली पसंतीही मिळत आहे. सेंद्रीय असूनही माहीच्या शेतातील भाज्यांचे दरही खिशाला परवडतील असेच आहेत. किंबहुना हे दर इतर भाजी विक्रेत्यांपेक्षा कमीच असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार झारखंड कृषी विभागानं ही भाजी आणि इतर गोष्टी युएईपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments