मालदीवमध्ये असे काय विशेष आहे की ते बॉलिवूड सेलिब्रिटींचे सर्वात आवडते ठिकाण आहे आणि सिने स्टार्स येथे सतत भेट देतात. आपण बऱ्याचदा सोशल मीडियावर पाहत असाल की अनेक सेलिब्रिटी हे आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवची निवड करतात. अनेक सेलिब्रटी कपल हे हनिमूनसाठी देखील मालदीवचीच निवड करतात. १२०० लहान बेटे असलेला देश मालदीव हा १२०० लहान बेटांनी बनलेला देश आहे. ज्यामध्ये फक्त २०० बेटांवरच लोक राहतात, यापैकी ५० बेटांवर पर्यटकांच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक बेटाचे स्वतःचे सौंदर्य आणि वैशिष्ट्य आहे.
नुकतच अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे नुकतेच मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. अभिनेत्री रकुल प्रीतसुद्धा सुंदर बेटांनी बनलेल्या या देशात फिरण्यासाठी गेली आहे. याशिवाय नुकतंच फरहान अख्तरने देखील मालदीवचे फोटो शेअर केले होते, तसेच वरुण धवन, मौनी रॉय, तापसी पन्नू हे देखील मालदीवमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
या अगोदरही बरेच सेलिब्रिटी हे वेळोवेळी येथे सुट्टीचा आनंद घेताना दिसून आले आहेत. पती गौतम किचलूशी लग्नानंतर काजल अग्रवाल हनीमूनला गेली होती आणि पूर्वी तिने सोशल मीडियावर सुंदर ठिकाणाहून बरीच छायाचित्रे शेअर केली होती, जिथे ती समुद्राच्या निळ्या पाण्यासमोर उभी होती आणि कधी कधी पाण्याखाली माश्यांच्या सानिध्यातील एका हॉटेलच्या खास खोलीत होती. अशा परिस्थितीत बऱ्याच चाहत्यांच्या मनात हा प्रश्न देखील उद्भवू शकतो की, मालदीवमध्ये असे आहे तरी काय ?
हिंदी महासागर प्रदेशातील बेटांच्या या देशात, जाण्यापूर्वी ७२ तास आधी घेतलेल्या चाचणीचे प्रमाणपत्र घेऊन येथे पोहोचता येते. प्रमाणपत्रात चाचणी प्रयोगशाळेचे नाव व पत्ता प्रविष्ट करणे गरजेचे आहे. मालदीवला कोव्हीड-१९ चा फारसा धोका नाही आहे. जगातील सर्वात सुंदर रिसॉर्ट्स आणि हॉटेल मालदीवमध्ये आहेत आणि समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यही मोहक आहे. इथे वॉटर व्हिला आहेत जिथे आपण काचेच्या खोलीत पाण्याच्याखाली राहण्याचा आनंद घेऊ शकतो. येथे मर्यादित बजेट असलेल्या लोकांना स्वस्त किंमतीत गेस्ट हाऊस देखील उपलब्ध आहेत, जिथे मालदीवला भेट देणारे लोक सहजपणे राहू शकतात. येथील सीफूड देखील लोकांना आकर्षित करते. इथल्या वैशिष्ट्यांमध्ये मालदीव स्पेशल चॉकलेटचादेखील समावेश आहे. सुरक्षित आणि सोप्या मार्गाने मालदीवचा प्रवास शक्य आहे आणि इथे राहण्यासाठी बर्याच स्तरांवर आकर्षक सुविधा आहेत. तसेच पर्यटक खेळ आणि विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊ शकतात. त्यामुळे या सुंदर ठिकाणी पर्यटक नेहमीच आकर्षिले जातात.