दरवर्षी २२ डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि महावीर यांच्यासह रामानुजन यांचंही नाव घेतलं जाते. National Mathematics Day अर्थात राष्ट्रीय गणित दिन हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस.
आजच्याच दिवशी महान गणित तज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. जगभरात हा दिवस ‘गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामानुजन जेव्हा इंग्रजी विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर ते गणित शिकले आणि आपली ओळख प्रस्थापित केली. त्यांनी गणितात १२० प्रमेय निर्माण केली. त्यासाठी केंब्रिज विद्यापीठाने त्यांनानिमंत्रित केले. यांनी फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जी बरीच फायद्याची ठरतात.
श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ मध्ये कोईंबतूरच्या ईरोड गावात झाला होता. ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. देश आणि जगातील काही महत्त्वपूर्ण गणिततज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव गणलं जाते. असं म्हटलं जातं की, त्यांना बालपणापासूनच गणिताची आवड होती. भारत सरकारने त्यांच्या जीवनकार्याचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं २२ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला. वयाच्या ३२ व्या वर्षी रामानुजन यांचं निधन झालं. २०१५ मध्ये त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा ‘The Man Who Knew Infinity’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग तंतोतंत साकारण्यात आले होते. १९७६ मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या पुस्तकालयात एक जुने रजिस्टर मिळालं होतं. ज्यामध्ये अनेक प्रमेय आणि सूत्र लिहिण्यात आली आहेत. या प्रमेयांना अद्याप कोणीही सोडवू शकले नाहीत. हे रजिस्टर ‘रामानुजन नोट बुक‘ या नावाने ओळखले जाते.
गणित विषय म्हटला तरी अनेकांना धडकी भरते, मात्र आज राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने काही अशा भारतीयांना ज्यांना गणिताची कधीच भीती वाटली नाही. उलट त्यांनी गणिताशी मैत्री केली, गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. अतिशय झपाट्यानं नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणाऱ्या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढवणं हा त्यामागचा निस्वार्थ मुख्य हेतू आहे.