Monday, March 1, 2021
Home Lifestyle News ख्रिसमस.. येशुंचा जन्मदिवस

ख्रिसमस.. येशुंचा जन्मदिवस

२५ डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस. दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. ख्रिश्नन लोकं या सणाला फार महत्व देतात कारण जीझस ईश्वराचे पुत्र असल्याची त्यांची श्रद्धा आहे. परंतु काही ठिकाणी नाताळ २५ डिसेंबरऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. नाताळ हा आनंदाचा सण आहे. ख्रिसमसचा शब्दश: अर्थ आहे क्राइस्ट्स मास अर्थात येशुच्या जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहिक प्रार्थना. जगभरचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते. या दिवशी चर्चमध्ये प्रार्थना, कॅरॉल्सचे गायन करण्यात येते. शुभेच्छा कार्डसची घेवाण देवाण होते. ख्रिश्चन बांधव नाताळच्या आगमना अगोदर पासूनच प्रार्थना व कॅरॉल्सच्या गायनाला सुरूवात करतात. आज संपूर्ण जग नाताळ अर्थात ख्रिसमस साजरा करत आहे. एकमेकांना भेटवस्तू देण्याबरोबरच लोक एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील देत असतात.

ख्रिश्चन बांधव एक दूसरयांची गळाभेट घेवून शुभेच्छांचे आदान प्रदान करतात. चर्चमध्ये मंगल कामनेचे प्रतिक म्हणून ख्रिसमच-ट्रीची सजावट केली जाते. आज ‍नाताळला धार्मिकते सोबतच सामाजिक महत्वही प्राप्त झाले आहे. इंग्रजी भाषीक देशामधील लोकं या दिवशी एक विशेष प्रकारची पुडिंग व केक इत्यादी बनवतात. भारताच्या नागरी भागात हा सण पश्चिमी देशां सारखच साजरा करतात. या दिवशी सांता क्लॉज मुलांना मिठाई व भेट वस्तू देतो असे मानले जाते. परंतू देशातील आदिवासी आणि खेड्या पाड्‍यांच्या लोकांच खानपान या दिवशी वेगळे असते. तांदुळाच्या रव्या पासून बनविलेली केक व केळी हे यांच्या जेवणाचा एक महत्वपूर्ण भाग असतो. आर्थिक रित्या संपन्न नसणारया घरात हे व्यंजन भेट म्हणून पाठविण्यात येते. दक्षिण भारतात काही भागात पायस वाटण्यात येतो. परंपरावादी ख्रिश्चन लोकांसाठी हा सण प्रार्थना आणि आत्मशु‍द्धीचे कारण असते, म्हणून रोमन कॅथोलिक्स संप्रदायाचे लोक एक डिसेंबर पासून पंचवीस डिसेंबरपर्यंत फक्त शाकाहारी भोजनाचे सेवन करतात.

merry christmas

ख्रिसमस बद्दल अजून एक गोष्ट आवर्जून विचार करायला लावणारी आहे ती म्हणजे आपण कधी असा विचार केला आहे का की, जेव्हा आपण कुठल्याही सणाच्या शुभेच्छा देतो तेव्हा ‘Happy’ हा शब्द वापरतो. पण नाताळच्या शुभेच्छा देताना, ‘हॅपी ख्रिसमस’ न लिहिता, केवळ ‘मेरी ख्रिसमस’च का पाठवले जाते? आज आपण पाहूया काय आहे त्यामागचे गुपित. ‘मेरी’  या शब्दामध्ये थोड्याशा भावना देखील जोडल्या गेल्या आहेत. या शब्दांत आनंदाची अभिव्यक्ती देखील आहे. तर, हॅपी हा शब्द केवळ शुभेच्छा देण्यासाठी वापरला जातो. अशा वेळी लोक नाताळ सणाच्या शुभेच्छा देताना त्याला अधिक भावनात्मक करण्यासाठी ‘मेरी’ हा शब्द वापरला जातो. तसे, मेरी शब्द हा शब्दकोषात बर्‍याच वर्षांपासून आहे आणि याचा उल्लेख १६ व्या शतकापासून केला जात आहे. सर्वाना ख्रिसमसच्या शुभेच्छा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments