Friday, February 26, 2021
Home Lifestyle News राष्ट्रीय शेतकरी दिवस

राष्ट्रीय शेतकरी दिवस

यंदा शेतकरी आंदोलनातच ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ साजरा केला जाणार आहे. नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटना पुढील बातचीतसाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावावर आज निर्णय घेणार आहेत. आज सकाळी सिंघु बॉर्डरवर पुन्हा एकदा बैठक होईल. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही होणार आहे. आज संपूर्ण देश राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा करत असताना भारतीय किसान युनियनने आज एकवेळ न जेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनांनी जनतेला आवाहन केलं आहे की त्यांनी आज दुपारचं जेवण बनवू नये आणि त्याद्वारे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा.

देशाचे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस म्हणजेच २३ डिसेंबर रोजी भारतात शेतकरी दिवस’ साजरा केला जातो. शेतकऱ्यांचे नेते म्हणून लोकप्रिय असेलल्या चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांचं आयुष्य आणि परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची सुरुवात केली होती. त्यांच्या या योगदानासाठी भारत सरकारने २००१ पासून चौधरी चरण सिंह यांच्या सन्मानार्थ दरवर्षी २३ डिसेंबर हा दिवस शेतकरी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

चौधरी चरण सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. यादरम्यान त्यांनी अनेक महत्त्वाची कामे केली. त्यांच्या निस्वार्थ कार्यामुळेच आज शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. त्यांनी जमीनदारी रद्द केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लेखापद हे पद बनवले. त्यानंतर ते उपपंतप्रधान बनले आणि मग पंतप्रधानपदी विराजमान होऊन देशाची सेवा केली. भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी चौधरी चरण सिंह यांनी अनेक कामे केली होती. देशाच्या संसदेत शेतकऱ्यांसाठी चौधरी चरण सिंह आवाज उठविला होता. चौधरी चरण सिंह हे २८ जुलै १९७९ पासून १४ जानेवारी १९८० पर्यंत देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी गाझियाबादमध्ये काँग्रेस समिती स्थापन केली होती. गांधीजींनी मीठा साठी केलेल्या दांडी यात्रा काढली होती तेव्हा चरण सिंह यांनीही हिंडनमध्ये मीठाचा कायदा मोडला होता. यासाठी त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते पुन्हा देशसेवेच्या कामात सक्रिय झाले. चौधरी चरण सिंह यांचा जन्म २३ डिसेंबर १९०२ रोजी उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचं नाव चौधरी मीर सिंह होते. चौधरी चरण सिंह लहान असतानाच त्यांचं कुटुंब जानी परिसरात स्थायिक झाले. त्यांनी आग्रा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले होते. यानंतर गाझियाबादमध्ये काही काळ वकिलीही केली होती. महात्मा गांधींजींच्या विचारांचा त्यांच्यावर विशेष पगडा होता. या वर्षीचा आंदोलनातील राष्ट्रीय शेतकरी दिवस वेगळाच ठरला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments