Friday, February 26, 2021
Home Lifestyle News दे मजसी वचन तू...

दे मजसी वचन तू…

व्हॅलेंटाईन वीकमध्ये ११ फेब्रुवारी हा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करण्यात येतो. या अगोदर वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे, टेडी डे साजरा करण्यात येतो. आयुष्यभर एकमेकांसाठी काहीतरी करण्यासाठी आणाभाका घेण्याचा, वचन देण्याचा, आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याची ग्वाही देण्याचा हा दिवस. यादिवशी नव-नव्या जोडप्यांसह प्रेमबंधनात अडकलेले सर्वजण एकमेकांवर आयुष्यभर प्रेम करण्याची आणि प्रेम करणाऱ्यांना सदैव मदत करण्याची वचने देतात. यादिवशी वेगवेगळे इमेजेस, मेसेजेस पाठवून तरुणाई आपल्‍या भावना व्‍यक्‍त करतात.

 

मला तुझ्याकडून फक्त

एकच वचन हवं,

कितीही भांडण झालं तरी

आपलं नातं जीवापाड प्रेम करणारे हवं…

Happy promise day 

happy promise day

एखादे नाते कमजोर करण्यासाठी भांडणाचे मोठे योगदान असते. छोटी छोटी भांडणं चांगली मानली जातात कारण यामुळे दोघांतील प्रेम अजूनच वाढते. पण ही भांडणं जेव्हा वाढू लागतात तेव्हा मात्र ती नातं तुटण्याचं सर्वात मोठं कारण बनतात. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला व्यर्थ न भांडण  करण्याचे वचन नक्कीच देऊ शकता.

कोणत्याही नात्याला पुरेसा वेळ देणं खूप गरजेचे आहे. अनेक नाती ही वेळ न दिल्यामुळे तुटतात. सध्याच्या दैनंदिन जीवनात घर-ऑफिस अशी तारेवरची कसरत करताना स्वतः साठी निवांत वेळ काढणे अशक्यप्राय बनले आहे. पण किमान आठवड्यातील एक दिवस तरी आपल्या नात्यासाठी राखून ठेवा ज्यामुळे तुमचे नाते टिकण्यास मदत होईल.

एखादे नातं तेव्हाच मजबूत होतं जेव्हा दोघंही व्यक्ती एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवतात. तसंच एकमेकांचा आदर करतात. यामुळेच नातं आणखी दृढ होत जातं. आपल्या जोडीदाराला त्याची स्पेस द्या, पूर्णवेळ दोघे एकत्रच असतात यामध्ये यामध्ये निदान दिवसातले तीन ते चार तास स्वतःसाठी घालवणे गरजेचे आहे. स्पेस न दिल्यास नात्यात दुरावा येण्याची दाट शक्यता आहे.

एकदा कोणत्या नात्यावरुन किंवा व्यक्तीवरुन विश्वास उडाला तर पुन्हा ते नातं पहिल्यासारखं बनणं फार कठीण होतं. आपल्या जोडीदाराशी कधीही खोटे बोलू नका. कोणतेही संबंध हे विश्वासावर आधारित असतात. आपण आपल्या जोडीदाराचा विश्वास मोडत तर नाहीत ना हे लक्षात ठेवा. कारण तुमचा जोडीदार तुमच्याकडून नेहमी सत्याची अपेक्षा करतो. शेवटी कोणताही नाते हे फक्त आणि फक्त विश्वासावरच टिकते. त्यामुळे अशा विश्वासाला कधीही तडा जाणार नाही असे वाचन नक्कीच लाइफपार्टनरला द्यावे आणि प्रामाणिकपणे पाळावे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments