जुन ते सोन या म्हणीची उक्ती नक्कीच या फॅशनच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. सध्या जुन्या फॅशन परंतु त्याच्यात झालेले हायटेक बदल घडवून नवीन रुपात आलेल्या आपण पाहतो. जसे कि त्यामध्ये कपड्यांची फॅशन असेल, पारंपारिक दागिने असतील, ठेवणीतील स्वयंपाकाची भांडी, साड्यांचे प्रकार असतील, अशा एक ना अनेक प्रकारामध्ये आत्ताच्या युगात विविधता बघायला मिळते. हल्लीच्या काळात एका व्यक्तीमागे कपाट भरभरून कपडे असतात. कधी कोणी प्रेमाने घेतलेले, लग्नकार्यात मिळालेले आणि आपणच हौसेने घेतलेले कपडे अशी कपड्यांची भाऊगर्दी असते. कपाटातील समाजातील पोशाख आणि वेशभूषा निश्चित होत जाताना त्यांवर अनेक घटकांचा प्रभाव पडतो. पोशाखपद्धती ही समाजविशिष्टच असते. समाजाच्या धार्मिक, सामाजिक,आर्थिक,शासकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचा व कल्पनांचा त्यावर फार मोठा परिणाम होतो.
आज आपण पाहणार आहोत टाय-डाय फॅशन लुक बद्दल. प्रथम पाहूया टाय-डाय म्हणजे नक्की काय .. ! बॉलीवूडच्या ९० च्या दशकातील सिनेतारका असतील अथवा सध्याच्या काळातील अगदी हॉलीवूडच्या तारकांमध्ये हा टाय-डाय कपड्यांचा ट्रेंड सुरु आहे. २ अथवा त्यापेक्षा जास्त रंगांचे कॉम्बिनेशन असणा-या कपड्यांच्या फॅशन ला टाय-डाय असे म्हणतात. कापडाचे विविध प्रकार पूर्वापार चालत आले आहेत आणि सध्या त्याचीच नवीन रूपाने फॅशन ट्रेंड होत आहे. सिनेसृष्टीतील ब-याच तारका सध्या या लूकमध्ये दिसून येत आहेत. सिनेतारका कायमच वेगवेगळ्या स्टायलिश कपड्यांमध्ये स्वतःला जगासमोर रिप्रेझेंट करत असतात. यापैकीच एक टाय-डाय फॅशन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे सगळीकडे टाय-डाय कपड्यांच्या प्रकारचा ट्रेंड सुरु आहे. अगदी पारंपारिक ते आधुनिक प्रकारामध्ये कपडे शिवले जात आहेत.
शिल्पा शेट्टी कोणत्याही शैलीत स्वत:ला सहजपणे कॅरी करते. अलीकडेच सुट्ट्यांचा आनंद घेताना टाय-डाय जंप सूटमध्ये दिसली होती. अभिनेत्री जाह्नवी कपूरने देखील नुकताच टाय-डाय टी-शर्ट आणि शॉर्ट्स घातल्या होत्या. विकेंड ट्रीपला तुम्ही देखील जान्हवीचा हा कूल लूक ट्राय करायला काहीच हरकत नाही. फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूड स्टार्सनीदेखील टाय-डाय ट्रेंड फॉलो केला होता. हॉलिवूड अभिनेत्री कायली जेनरने देखील टाय-डाय जंपसूट परिधान केला होता. अनन्या पांडे ही कायम तिच्या फॅशनेबल लूकसाठी ओळखली जाते. अलीकडेच अनन्याने टाय डाय केलेल्या पॅन्ट्स परिधान केल्या होत्या. तिने ट्यूब टॉपसह टाय-डाय ट्राऊजर परिधान केला होता. अशाप्रकारे, आजच्या विविधांगी फॅशन च्या दुनियेत जुन्या फॅशन पुन्हा एकदा नव्या रुपात येत आहेत.