Friday, February 26, 2021
Home Lifestyle News व्हॅलेंटाइन डे – प्रेम दिवस

व्हॅलेंटाइन डे – प्रेम दिवस

प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते. कधीही वेळीच व्यक्त झालेले चांगले. आपल्या भारतामध्ये अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात त्यामागे काही तरी कारण असते संस्कृती असते आणि त्याला इतिहास सुद्धा असतो लोक हे सण आपापल्या पद्धतीने साजरे करत असतात. दरवर्षी १४ फेब्रुवारीला हा दिवस साजरा करण्याची प्रथा पडलेली आहे. भारतामध्ये सुद्धा या गोष्टीला आता मान्यता मिळू लागलेली आहे या दिवशी प्रेमी किंवा प्रेमिका एकमेकांना चॉकलेट देऊन हा सण साजरा करतात. व्हॅलेंटाइन डेला मराठी मध्ये प्रेमाचा दिवस असे ओळखले जाते या दिवशी प्रेमी किंवा प्रेमिका एकमेकांना लाल फुल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. हा दिवस सेंट व्हॅलेन्टाईन नावाच्या ख्रिश्चन हुतात्म्यांच्या नावाने साजरा करतात. इ.स. २७० च्या आसपास एक ख्रिश्चन संत व्हॅलेन्टाईन होउन गेले. एका दंतकथे नुसार संत व्हॅलेन्टाईन चा हा बलिदान दिवस आहे. पाहूया काय आहे नक्की व्हॅलेन्टाईन डे ची कहाणी.

old couple celebrating Valentine's Day

व्हॅलेन्टाईन डे ची कहाणी :

रोममध्‍ये सम्राट क्‍वॉलिडियसचे राज्‍य होते. लग्‍न केल्‍यामुळे पुरूषांची शक्‍ती आणि बुद्धी कमी होते, असे क्‍वॉलिडियसला वाटत असत. त्‍यामुळे त्‍याने कोणत्‍याही सैनिकाने आणि अधिका-याने लग्‍न करू नये असा मुलूखावेगळा नियम बनवला होता. संत व्हॅलेंटाइनने सम्राटाच्‍या या आदेशाला विरोध केला. राजाच्या या निर्णयाने शिपाई मध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे सगळेजण या आदेशाच्या विरुद्ध होते पण राजाच्या भीतीने कोणीही याबद्दल काहीही बोलले नाही. पण रोमचे संत व्हॅलेंटाइन यांनी या आदेशाला नाकारले आणि त्यांनी लपून-छपून राज्यांमधील शिपायांचा विवाह लावून देण्याची प्रथा चालू केली. राज्य मधला शिपाई आपल्या प्रेमिकेसोबत विवाह करू इच्छित असेल तर ते संत व्हॅलेंटाइन  यांना भेटत असे आणि व्हॅलेंटाइन त्यांना मदत करत असे. काही दिवसांनी राजा क्‍वॉलिडियसला  हा प्रकार माहीत झाला. संत व्हॅलेंटाइन यांनी राजाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे राजाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आणि त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. संत व्‍हेलेंटाइन यांना इसवी सन २७० च्‍या फेब्रुवारी महिन्‍याच्‍या मध्‍यास दफन करण्‍यात आले होते, असे काही ठिकाणी म्‍हटले जाते. तेव्‍हापासून त्‍याच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ प्रेम दिवस म्‍हणजेच व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. प्राचीन रोममध्‍ये फेब्रुवारीला सफाई करण्‍याचा महिना देखील म्‍हणतात. तेथील लोक यावेळी घराची रंगरंगोटीही करतात.

Valentine's Day prem divas

पण आपल्याकडे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेयसी आणि प्रियकर यांचाच दिवस असं समजलं जातं पण मुळात हा समज चुकीचा आहे कारण व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे आणि ज्या प्रत्येक नात्यात प्रेम आहे त्या प्रत्येक नात्याचा हा दिवस आहे. जगभरात हा दिवस याच उद्देशाने साजरा केला जातो. लोक आपल्या आवडीच्या व्यक्तीला मग ती कोणी का असेना आई, बाबा, बहिण, भाऊ सुद्धा आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो हे दाखवून देता येते. प्रेम दिवसाच्या शुभेच्छा !

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments