व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोज डे, प्रपोज डे आणि चॉकलेट डे नंतर टेडी डे साजरा केला जातो. टेडी बिअर हा सर्वांचा लाडका आहे. प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सर्वात आवडता असा फेब्रुवारी महिना आणि व्हॅलेंटाईन वीक सध्या सुरु आहे. आज त्यातील चौथा दिवस आहे. १० फेब्रुवारी हा दिवस टेडी-डे म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी प्रेम करणारी व्यक्ती एकमेकांना गिफ्ट म्हणून टेडीबिअर देतात. खासकरुन मुली आणि लहान मुलांचा लाडका असलेला टेडी आज जास्त खास असतो. कारण आज प्रेमी आपल्या प्रेयसीला टेडी बिअर गिफ्ट करतो. बाजारात देखील वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे टेडी सध्या विक्रीसाठी आले असून टेडीची मोठी विक्री प्रत्येक वर्षी होत असते.
या टेडी डे चा उद्या नक्की कुठून झाला ते थोडक्यात जाणून घेऊया. टेडी बिअरची सुरूवात अमेरिकेतून सुरू झाली. रूझवेल्ट हे अमेरिकेचे २६ वे अध्यक्ष होते. रुझवेल्ट एक राजकारणी होतेच त्याचबरोबर ते एक चांगले लेखक देखील होते. मिसिसिपी आणि लुझियातील वाद मिटविण्यासाठी रुझवेल्ट मिसिसिपीच्या भेटीला गेले होते. समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी मोकळ्या वेळात मिसिसिपी जंगलाला भेट दिली. या वेळी त्यांनी झाडाला बांधलेल्या जखमी अस्वलाला पाहिले. या अस्वलाला कोणीतरी बांधले होते. अस्वल वेदनेने तळमळत होता. रुझवेल्टने अस्वलाला सोडले पण त्याला गोळी घालण्याचा आदेश दिला. जेणेकरून त्याला त्रासातून कायमची मुक्तता मिळेल. अमेरिकेत या घटनेची सर्वत्र चर्चा झाली. या घटनेशी संबंधित एक व्यंगचित्र एका नामांकित वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. हे व्यंगचित्र व्यंगचित्रकार बेरीमन यांनी बनविलेले अस्वल लोकांना आवडले. अमेरिकेच्या टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम अस्वलच्या व्यंगचित्रातून इतके प्रभावित झाले कि, त्यांनी या अस्वलाचा आकार असलेले एक खेळणे बनवून त्याचे नाव टेडी बिअर ठेवले. रुझवेल्ट यांचे टोपणनाव ‘टेडी’ होते. त्यामुळे राष्ट्रपतींकडून त्यांच्या नावावर हे खेळण्याचे नाव ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते बाजारात आणले गेले. लोकांना ते इतके आवडले की त्याची विक्री लगेच झाली. तेव्हापासून हे नाव लोकप्रिय झाले आहे. जगातील पहिले टेडी बिअर १९८४ पासून अजूनही इंग्लंडच्या पीटरफिल्डमध्ये सुरक्षित ठेवले आहे.
आजच्या या विशेष दिवशी आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला क्युट टेडी गिफ्ट करून तुम्ही तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करू शकता. काही कारणास्तव तुमचा पार्टनर जर तुमच्या सोबत नसेल तर निराश होऊ नका. सोशल मीडियाद्वारे तिला/त्याला टेडीच्या क्युट फोटोसह ग्रीटिंग पाठवा. टेडी गिफ्ट करून त्या व्यक्तीला हे देखील सांगा की, You are so special for me. म्हणतात ते खोटे नव्हे प्रेमाला वय, रंग, मर्यादा काहीच नसते.