Sunday, March 7, 2021
Home Lifestyle News शाकाहारी आहारपद्धती योग्य

शाकाहारी आहारपद्धती योग्य

शाकाहारी आहार ही आरोग्य आणि तंदुरुस्त शरीराची गुरुकिल्ली आहे. हे आहेत शाकाहारी आहाराचे अनेक फायदे आहेत. असे म्हणतात कि, लाल मांसाच्या सेवनाचा वाईट परिणाम हृदयावर होतो. याच्या उलट फळे आणि भाज्या असलेल्या आहारामुळे हृदयविकाराच्या झटक्याची जोखीम कमी होते. पण हृदयाच्या आरोग्यासाठी शाकाहार हा मांसाहारापेक्षा चांगला आहे हे सिद्ध करणारा काहीही पुरावा उपलब्ध नाही. शाकाहाराचा महत्वाचा भाग असलेल्या फळे आणि भाज्यांमध्ये जीवनसत्व क आणि ड मुबलक प्रमाणात असते तसेच झिंकसारखी खनिजेही असतात. यामुळे असे म्हटले जाते की शाकाहारामुळे इन्फेक्शन्सची भीती कमी होते. अनेक संशोधनांमधून पुढे आले आहे की मांसाहारामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते, तर काही अभ्यासांनी असे सांगितले आहे की शाकाहारी लोकांना या आजाराचा धोका कमी असतो. पण या दोन्हीमधील फरक फारसा मोठा नाही. संशोधनाने सांगितले आहे की वनस्पतीयुक्त आहार टाईप २ मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. फळे, भाज्या, दाणे, बिया यांमधील मुबलक तंतूमय पदार्थ यात महत्वाची भूमिका बजावतात.

शाकाहारातील खाद्यपदार्थ हे खूप पौष्टिक असले तरी काही पोषक पदार्थ मात्र मांसाहारातच मुबलक प्रमाणात असतात. यात जीवनसत्व ड, ब १२ आणि इतरांचा समावेश होतो. जर आपण कडक शाकाहारी असाल तर या पोषकघटकांची कमतरता शरीरात होण्याची शक्यता असते. यामुळे शरीरातील काही संस्थांवर परिणाम होऊन आजार होण्याची शक्यता असते. प्रथिने ही आयुष्याचा महत्वाचा भाग म्हणून ओळखली जातात. हाडे आणि स्नायूंची वाढ, विकास होण्यासाठी आणि शरीराची झीज भरून निघण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची असते. पण शाकाहारामध्ये शुद्ध प्रथिनांचे स्रोत फारच कमी असतात, त्यामुळे शाकाहार हा खरेच आरोग्यपूर्ण आणि पुरेसा असतो का हा प्रश्न उभा राहतो. शाकाहाराला काही काळानंतर शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पोषणाची गरज पूर्ण करण्यासाठी इतर सप्लिमेंट्सची आवश्यकता भासते. ही गरज पूर्ण न झाल्यास पोषणाचा अभाव शरीरात निर्माण होऊ शकतो. शाकाहार हा तुलनेने अधिक निसर्गपूरक असतो. कारण हा प्राण्यांपासून मिळणारे आहारपदार्थ कमी करतो आणि निसर्गाचा समतोल राखण्यास मदत करतो.

शाकाहार हा आरोग्यपूर्ण असला तरीही त्याच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे फक्त इतर लोक करत आहेत म्हणून एखादी आहारपद्धती स्वीकारण्या आधी आपली जीवनशैली, आरोग्यपद्धती आणि इतर गोष्टी लक्षात घेण्याची गरज असते. ज्यांना हा बदल करणे शक्य आहे त्यांनी जरूर करावा, पण शरीराला समतोल आहार मिळणे अत्यावश्यक आहे याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments