जगात ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस म्हणून साजरा केला जातो. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आजारांच्या यादीत कॅन्सर हा महत्त्वाचा आजार म्हणून समोर येत आहे. भारतात कुठल्याही घडीला २५ लाख कॅन्सर पीडित रुग्ण आढळतात. त्यात दरवर्षी आठ-नऊ लाख नवीन रुग्णांचे निदान होते. एका अहवालानुसार बालकांमध्ये कॅन्सरची दरवर्षी मोठी होत आहे. या आजारावर मात करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे याविषयी कोणत्याही गैरसमजुती अथवा अफवांकडे लक्ष न देता त्याबाबतीत असायला हवी जागरूकता. १९३३ मध्ये आंतराष्ट्रीय कॅन्सर नियंत्रण संघाने स्विझरलँड मधील जिनेवा शहरात पहिल्यांदा जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यात आला होता.
जगात कॅन्सरमुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. हा शरीरातील पेशींमध्ये वेगाने पसरणारा आजार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी ७६ लाख लोकांचा कॅन्सरमुळे मृत्यू होतो. कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांमध्ये ४० लाखांहून अधिक लोक ३० ते ६९ वयोगटातील असल्याची माहिती आहे. एका अंदाजानुसार, २०२५ पर्यंत कॅन्सरमुळे वेळेआधीच मृत्यू होणाऱ्यांच्या आकड्यात वाढ होऊन तो दरवर्षी ६० लाखांपर्यंत पोहचू शकतो. कॅन्सरबाबत अनेकांमध्ये गैरसमज आहेत. देशातील अनेक डॉक्टरांनी, समजूतीने आणि काही गोष्टी टाळून कॅन्सरपासून बचाव केला जाऊ शकत असल्याचं सांगितलं आहे.
कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाला तर इतरांनाही होऊ शकतो असा अनेकांचा समज असतो. परंतु केवळ ५ ते १५ टक्के कॅन्सर अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतात. कुटुंबातील सर्वच जण एकाच प्रकारची जीवनशैली, आहार घेतात, त्यावेळी एकाच प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. डॉ. अंशुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं सर्वात मोठं कारण हे फास्ट फूड, तळलेले पदार्थ, फॅटी फूड खाणं हे असल्याचं सांगितलं. अशाप्रकारच्या खाण्यामुळे मुलांमध्येही कॅन्सरची शक्यता निर्माण होऊ शकते. चुकीचा आहार, चुकीचं खाणं-पिणं कॅन्सरचं कारण ठरत आहे.
कॅन्सर संबंधित डॉक्टरांनी घ्यायची खबरदारी म्हणून , ३० वय वर्षानंतंर प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा संपूर्ण बॉडी चेकअप करणं आवश्यक असल्याचं सांगितलं आहे. अशाप्रकारे केलेल्या बॉडी चेकअपमुळे, कॅन्सरचा कोणताही धोका ओळखून त्यावर लवकरात लवकर इलाज केले जाऊ शकतात. देशात अधिकतर कॅन्सरचं निदान अतिशय उशिरा होतं. कॅन्सरचं निदान होण्यास उशिर झाल्याने कॅन्सर शरीरात अधिक प्रमाणात पसरला जातो. अशात इलाजासाठी खर्चही अधिक प्रमाणात होतो. ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कॅन्सर दिवस साजरा करण्यामागे, कॅन्सरबाबत अधिक जागरुकता निर्माण करणं एवढाच आहे.