Thursday, February 25, 2021
Home Lifestyle News ध्यानधारणा एक उत्तम योग

ध्यानधारणा एक उत्तम योग

ध्यान धारणा म्हणजे एक प्रकारे कोणत्याही गोष्टीमध्ये एकाग्रता निर्माण करणे होय. मनाची आणि शरीराची योग्य सांगड घालण्यासाठी ध्यान साधने सारखा उत्तम पर्याय नाही. पूर्वीच्या काळापासून साधू संत ध्यान करून आपल्या शरीराची आणि मनाची योग्य काळजी घेत असत. प्रार्थना व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे होत. सावकाशपणे व पायरीपायरीने आपण आपल्याला वळण लावायचे असते. सूर्योदय आणि सूर्यास्त, जेव्हा निसर्ग दिवस आणि रात्र यांच्या रुपांतरामध्ये असतो तेव्हाच्या या दोन वेळा ध्यानाकरिता योग्य असतात. ध्यानाच्या तयारी करिता केवळ काही वेळ दिल्याने, तुम्हाला ध्यानाचा गहन अनुभव घेता येऊ शकतो हे तुम्हाला माहिती आहे.

ध्यान ही एक प्रकारे विश्रांतीची वेळ आहे, म्हणून ते करणे हे संपूर्णपणे तुमच्या सोयीनुसार व्हायला पाहिजे. ज्याच्या मध्ये तुम्हाला तुमचे शरीर आणि मन स्थिर ठेवता आले पाहिजे. म्हणून ध्यान करण्याकरिता अशी वेळ निवडा की त्यावेळेत तुम्हाला कोणताही व्यत्यय येणार नाही. ज्याप्रमाणे सोयीस्कर वेळ निवडणे जरुरी आहे त्याचप्रमाणे अशी जागा निवडा जिथे तुम्हाला इतर कोणताही व्यत्यय येणार नाही. शांत आणि निःशब्द परिसरामुळे ध्यानाच्या अनुभवाचा अधिक आनंद लुटता येतो आणि शारीरिक संपूर्ण विश्रांती मिळते. तुमच्या शरीराची ढब याने बराच फरक पडतो. तुम्ही शिथिल आहात, सुखावह आणि स्थिर आहात याची खात्री करा. पाठीचा कणा सरळ ठेवून ताठ बसा, खांदे आणि मान यांना ढिले सोडा आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डोळे बंद ठेवा. ध्यानाला बसण्याअगोदर थोडे हलके व्यायाम किंवा सूक्ष्म योग केल्याने रक्ताभिसरण सुधारते, आळस आणि अस्वस्थता निघून जाते आणि शरीर हलके वाटू लागते. तुम्ही स्थिरपणे अधिक काळासाठी बसू शकाल. ध्यान करणे सोपे व्हावे म्हणून ही पुन्हा एकदा तयारी आहे. ध्यान करण्याच्या आधी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे तसेच थोडे प्राणायाम करणे हे नेहमीच उपयुक्त ठरते. यामुळे श्वासाची गती स्थिर होण्यास मदत होते आणि ते मनाला शांत ध्यानस्थ अवस्थेत घेऊन जाते.

yoga meditation

तुम्हाला स्वतःला फरक लक्षात येईल. मंद हास्य सतत ठेवल्याने तुम्हाला शिथिल, शांत वाटते. जेव्हा तुमचे ध्यान संपत येते तेव्हा डोळे उघडण्याची आणि त्वरित कामाला लागण्याची घाई करू नका. स्वतःबद्दल आणि तुमच्या सभोवतालच्या परिसराबाबत जागरूक होत तुमचे डोळे मंद गतीने आणि सावकाश उघडा. विद्यार्थिपणात अभ्यासावर ध्यान करावे लागते. आपल्यापाशी असलेले ज्ञान दुसऱ्याला देताना एकाग्रता लागते. एखाद्या विषयावर आपले लक्ष्य पूर्णपणे केंद्रित करणे हेही ध्यानच आहे. फक्त त्यासाठी आवश्यक आहे ते योग्य वेळ, ठिकाण आणि शांतता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments