Sunday, February 28, 2021
Home Maharashtra News भीमा कोरेगाव द्विशतक पुर्ती, एल्गार परिषद भरणार नाही

भीमा कोरेगाव द्विशतक पुर्ती, एल्गार परिषद भरणार नाही

दरवर्षी १ जानेवारीला एल्गार परिषदचे आयोजन केले जाते. यंदा मात्र, ३१ डिसेंबरला ही परीषद घेतली जाणार आहे. हा कार्यक्रम सांस्कृतिक असतो. या कार्यक्रमासाठी आंबेडकरवादी, लोकशाहीवादी अशा विविध संघटना देशभरातून येतात. याठिकाणी प्रबोधनात्मक भाषणं होतात. आर्थिक आणि सामाजिक विषमतेविरोधात संघटना आपल्या भूमिका मांडत असे कोळसे पाटील यांनी म्हंटले होते. भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी होणाऱ्या विजयस्तंभाच्या अभिवादन कार्यक्रमासंदर्भात राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरवर्षी हजारो अनुयायी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे एकत्र येतात. पण यंदा अनुयायांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. भीमा कोरेगावात १ जानेवारीला झालेल्या हिंसाचाराचं मूळ वढू या गावात असण्याची शक्यता आहे. संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कोणी केले यावरून दोन समाजगटांमध्ये अनेक वर्षांपासून वाद आहेत. दलित समाजातील गोविंद गायकवाड यांचं स्मरण म्हणून भीमा कोरेगावपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या वढू येथे उभारण्यात आलेली शेड आणि माहिती फलक यावरून गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गटांमध्ये वाद सुरू होता. संभाजी महाराजांच्या समाधीचा हा वाद आहे. गोविंद गायकवाड नावाच्या व्यक्तीवरून हा वाद आहे. संभाजी महाराजांचे सगळं तुकडे तुकडे झालेले शरीर शिवून अंत्यविधी केला,  त्या गोविंद गायकवाडांच्या संदर्भात त्या ठिकाणी वाद चाललेला आहे. ती जागा उद्ध्वस्त करण्यात आली. त्यामध्ये मिलिंद एकबोटे होते आणि त्यांच्याचबरोबर संभाजी भिडे होते. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेत हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप केले आहेत  आणि गेल्या आठवड्यात कोरेगांव परिसरात घडलेल्या घटनांच्या चौकशीची मागणी केली आहे. त्या प्रकरणात पोलिसांनी केसेस केलेल्या आहेत. एकंदरीत ४९ आरोपी आहेत, ९ जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना १ जानेवारीच्या आठवडाभर आधी घडलेली आहे. त्याचा परिणाम इथे झाला का हा शोध घेणं त्याच्यातला एक भाग आहे,  असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभचं देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. शहरातील परिस्थिती व कोरोनाचे नवे संकट लक्षात घेऊन पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी नाकारली आहे.

तर, काही स्थानिक गावकऱ्यांनी या ऐतिहासिक संदर्भांना आक्षेप घेतला होता. “समाधीवरून काहीच वाद नव्हता. गायकवाड आणि गावकऱ्यांचे संबंध चांगले आहेत, आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो. पण बाहेरच्या संघटना आल्या, काही वेगळं सांगितले गेले आणि मग त्या केसेस दाखल झाल्या, असं रमाकांत शिवले म्हणाले.

कोरेगाव भीमा येथे घडलेली घटना दुर्दैवी आहे. हा प्रकार गैरसमजातून घडलेला आहे. झालेला त्रास, झालेल्या मालमत्तेचे नुकसान आणि दंगलीचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे समाजात दुही निर्माण करण्यामागे आणि अफवा पसरवण्यामागे ज्यांचा हात आहे,  त्यांच्याबाबत तपास करून पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी समस्त हिंदू आघाडीची मागणी आहे, असे मिलिंद एकबोटे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पोलिसांनीही भीमा कोरेगाव युद्धाच्या द्विशतकपूर्ती कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर या वादावर तोडगा काढायचा प्रयत्न केला होता. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी याविषयी सांगितलं,  दोन तीन दिवसांपूर्वी वढूमध्ये एका समाधीवरून वाद झाला होता. पण पोलिसांनी योग्य वेळेस हस्तक्षेप केला आणि कारवाई केली.

नंतर आम्ही गावातल्या दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र आणून वाद मिटवला होता. काही समाजकंटकांनी जर जाणूनबुजून या मुद्द्यावरून चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर पोलीस नक्की कारवाई करतील,  असे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments