Sunday, February 28, 2021
Home Maharashtra News नवीन संकट ऑन द वे.. महाराष्ट्रात अलर्ट

नवीन संकट ऑन द वे.. महाराष्ट्रात अलर्ट

कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ओढावलं नवं संकट. महाराष्ट्रात अद्याप संकट नाही. अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी. बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानातील अनेक जिल्ह्यांतूनही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी १७० हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे. पशुपालन विभागाच्या माहितीनुसार ४२५ हून जास्त कावळे, बगळे आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाड मधील पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळ मध्ये असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, इतर जिल्ह्यातील नमुन्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही.

बर्ड फ्लू हा एक संसर्गजन्य आजार आहे. हा आजार एवियन इन्फ्लूएंजा व्हायरस H5N1 मुळे होतो. मुख्यतः हा व्हायरस पक्षांना लक्ष्य करतो. ९० च्या दशकात बर्ड फ्लूच्या नवा स्ट्रेन समोर आला होता. बर्ड फ्लूचा नवा स्ट्रेन गंभीर आजार आणि मृत्यूचं कारण ठरु शकतो. बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या होतो,  परंतु ते पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरते. विष्ठा, नाकाचा स्राव, तोंडातील लाळ किंवा संक्रमित पक्ष्यांच्या डोळ्यांतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे हा आजार मानवांमध्ये पसरतो. H5N1 हा असा एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे, जो मानवांना संक्रमित करतो. हा विषाणू पक्षी तसेच मानवांसाठी खूप धोकादायक आहे. १९९७ मध्ये हाँगकाँगमध्ये त्याचे पहिले प्रकरण उघडकीस आले होते. व्हायरस म्युटेशन होतं, तसेच काही म्युटेशन जास्त संसर्गजन्य असल्याचा धोकाही संभवतो. परंतु, सध्या देशात थैमान घालणारा बर्ड फ्यूचं म्युटेशन जास्त संसर्गजन्य नसल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, असं असले तरीही काळजी घेणं गरजेचं आहे.

बर्ड फ्लूचा संसर्ग अनेक पक्षांच्या प्रजातींमध्ये वेगाने होतो. परंतु, साधारणपणे, एविएन इन्फ्लुएन्जा हा व्हायरस किंवा बर्ड फ्लू व्यक्ती किंवा पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक धोकादायक नाही. बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यानंतर २ ते ८ दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. संसर्ग झालेल्या लोकांना सामान्य फ्यूसारख्या लक्षणांचा सामना करावा लागतो. या लक्षणांमध्ये ताप, खोकला, उलटी, डोकेदुखी, सांधेदुखी, इनसोमनिया आणि डोळांचे आजार यांसारखी लक्षणं दिसून येतात. प्रौढ व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांनाही याच लक्षणांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोरोना पाठोपाठ येणाऱ्या या संकटाला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments