Monday, March 1, 2021
Home Maharashtra News महाराष्ट्रामध्येही बर्ड फ्लूचा शिरकाव

महाराष्ट्रामध्येही बर्ड फ्लूचा शिरकाव

परभणी जिल्ह्यात आणि राज्यात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होऊ नये म्हणून परभणीतील मुरुंबा गावातील तब्बल १० हजार कोंबड्या आज संध्याकाळपर्यंत नष्ट करण्यात येणार आहेत. मुरुंबा गावातील ८०० कोंबड्यांचा अचानक मृत्यू झाला होता. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्या दगावल्याने स्थानिक प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन या कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्यात या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाल्याचं निदान झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून जिल्हा प्रशासनाने मुरुंबा गावातील एक किलोमीटर परिसरातील दहा हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आज संध्याकाळपर्यंत या दहा हजार कोंबड्या मारुन जेसीबीने खड्डा खोदून त्यात या कोंबड्या गाडण्यात येणार आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षी मृतावस्थेत आढळून येत आहेत. या पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लू या आजाराने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यातच आता मुंबईतील नागरीकांमध्ये बर्ड फ्ल्युची भीती पसरली आहे. या भीतीचा थेट चिकन आणि अंड्यांवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. मुंबईत अंड्यांचे दर ६ रुपयांवरुन आज ५ रुपयांवर घसरले आहेत. तर, येत्या दोन दिवसांत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर अंडा बाजारात दर ३ ते ४ रुपयांवर येण्याची भीती अंडा व्यापाऱ्यांनी सतावते आहे. आज सकाळपासून एकही ग्राहक झाला नसल्याची विवंचनेत अंडा विक्रेते आहेत. मात्र, नागरीकांनी घाबरु नये अशी विनंती दुकानदारांनी केली आहे. मात्र, बर्ड फ्ल्यूची भीती असल्याने नागरीक धास्तावले आहेत. सरकारने जनतेला मार्गदर्शन करण्याची विनंती विक्रेत्यांची केली आहे.

देशाच्या इतर भागातही कोंबड्यांच्या विक्रीवर ७ ते ८ दिवस बंदी आहे. देशात दररोज कोट्यवधी कोंबड्या खाल्ल्या जातात. प्रसिद्ध गाझीपूर मंडीमधून दररोज ५ लाख कोंबड्यांची विक्री होते. अशा परिस्थितीत पोल्ट्री मालकांसमोर सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना वॅगनमध्ये ठेवून धान्य खाऊ घालणे ही आहे. चिकन किंवा अंडी खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू हा माणसांना होत नाही. भारतात बर्ड फ्लू माणसांना झाल्याची आजपर्यंत एकही घटना घडलेली नाही. फक्त चिकन आणि अंडी पूर्ण उकळून खाल्ली पाहिजेत, असं स्पष्टीकरण परभणीच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी दिली आहे.

अजून एक पोल्ट्री तज्ञ राजेश राजपूत म्हणतात, कोरोना-लॉकडाऊन दरम्यानही असेच घडले. कोंबड्यांमध्ये कोरोना झाल्याचा उल्लेख आलेला नव्हता. पण अंडी आणि कोंबड्यांची विक्री बंद झाली. किती काळ धान्य खायला घालायचे म्हणून जिवंत कोंबड्या आणि अंडी जमिनीत दफन केली गेली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments