Monday, March 1, 2021
Home Maharashtra News गिनीज बुक ऑफ रेकॉर्डेड पंकज कामळेची आत्महत्या

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डेड पंकज कामळेची आत्महत्या

गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नावाची नोंद असलेला आणि कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असलेल्या मुंबईच्या एका व्यावसायिक तरुणाने इंदूरमध्ये आत्महत्या करत आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आल आहे. पंकज कामळे असे या तरुणाचे नाव आहे. पंकजने इंदूरच्या ‘ग्लोडी पॅलेस’ नावाच्या एका बड्या हॉटेलच्या रुममध्ये गळफास घेत आपले आयुष्य संपवले. हॉटेलचे व्यवस्थापक आणि पंकजच्या टीमने या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. इंदूरच्या कनाडिया पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. पोलिसांना पंकजच्या रुममधून दीड लाखांची रोकड आणि एक डायरी सापडली आहे. त्याने या डायरीत ‘आय लव्ह यू नीलम’ असे लिहिलेले पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यासोबतच पंकजने आपल्या डायरीत आपल्या बँक खात्यात एक कोटी रुपये असल्याचा उल्लेखही केला आहे. पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे पुढील चौकशी सुरू केली आहे. या आत्महत्येमागे प्राथमिकदृष्ट्या प्रेमप्रकरण आणि तणाव ही कारणे असू शकतात, असा पोलिसांनि अंदाज वर्तविला आहे.

पंकज मुंबईतील सांताक्रूझ भागात राहत होता. पंकजने केवळ २८ व्या वर्षी आपल्या नावावर चार इव्हेंट कंपन्या स्थापन केल्या होत्या. तसेच त्याने एक ट्रेनिंग अकॅडमीही सुरू केली होती. प्लेअर बार टेंडर म्हणूनही पंकजने काम केले होते. त्याची ओळख केवळ मुंबईतच नाही तर बाहेरही प्रसिद्ध बार टेंडर म्हणून होती. केवळ १५ मिनिटांत १२० पद्धतीचे मॉकटेल तयार करून त्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डलाही नोंद झाली होती. पंकजचा चुलत भाऊ बेनी प्रसाद याच्या म्हणण्यानुसार, पंकज मुंबईतून इंदूरला काँग्रेस आमदार संजय शुक्ला यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी गेला होता. पंकजने या विवाहाच्या इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु, पंकज तब्येत अचानक बिघडल्याचे सांगत विवाहसोहळ्यातून बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या रुममध्ये पंकजचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला.

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी पंकजने आपल्या खांद्यावर घेतली होती. नागपूरमध्ये त्याची आई आणि लहान भाऊ राहतात. पंकजच्या आत्महत्येची बातमी पोलिसांकडून मिळाल्यानंतर कुटुंबीय इंदुरला दाखल झाले. त्याने यामध्ये आपल्या कामाच्या तणावाबद्दल काही उल्लेख केला होता. मृत्यूपूर्वी पंकजने आपल्या कुटुंबाला अनेक मॅसेज केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले. मी कामाच्या तणावामुळे मृत्यूला सामोरे जात असून यात कुणाचाही दोष नसल्याचे त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments