Saturday, March 6, 2021
Home Maharashtra News लोकल प्रवासात लहान मुलांना एन्ट्री नाही

लोकल प्रवासात लहान मुलांना एन्ट्री नाही

कोरोनाच्या संसर्गामुळे साधारण गेले ८ महिने असलेल्या लॉकडाऊन दरम्यान मुंबई लोकल रेल्वे २२  मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. पण सर्वसामान्य नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश मिळत नसल्याने,  सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवाय रस्त्यावर ट्रॅफिकमुळे मुंबईकरांचे अनेक तास हे प्रवासातच जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मनसेसह अनेक पक्षांनी मुंबई लोकल रेल्वे सर्व सामान्यांसाठी सुद्धा सुरु करण्याची मागणी शासनाकडे केली. अनलॉकची प्रक्रिया सुरु केल्यानंतर हळू हळू का होईना पण अनेक गोष्टी सुरु झाल्या. सुरुवातीला दुकाने, भाजी मार्केट, चिकण-मटण शॉप सुरु करण्यात आले. हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यात आली, आता सिनेमागृहदेखील सुरु करण्याच्या मार्गावर आहेत.

सुरुवातीला कोविड काळामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांनाच मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली होती, परंतु आत्ता मात्र राज्य सरकारने आता महिलांनाही मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. सरकारने त्याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केलं आहे. परंतु महिलांसाठी काही ठराविक वेळेच्या मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. तसेच महिलांना प्रवास करताना क्यू आर कोडची आवश्यकता नसेल. मात्र अनेक महिला आपल्या लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचं वारंवार समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, असे स्पष्ट सांगितले आहे. यानुसार मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करण्यात आलेला आहे. आरसीएफ जवान महिलांसोबत मुलं नाहीत, याची खात्री करून मगच महिलांना प्रवेश दिला जाईल. जर त्या महिलेसोबत लहान मुलं आढळून आले, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही. तिला रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी पाठवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.

small kids not allowed in mumbai local train

मुंबईतील अत्यावश्यक सुविधा हळूहळू पूर्ववत होत असताना मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल मात्र अद्याप सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे सुरु करण्यात आलेली नाही. दिवाळी नंतर वाढलेला कोरोनाचा संसर्ग पाहता आणि इतर राज्यांप्रमाणे कोरोनाच्या दुस-या लाटेची शक्यता पाहता शासन साधारण १५ डिसेंबर नंतरच लोकल पूर्णतः सुरु करायची कि नाही यावर निर्णय घेऊ शकणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments