Sunday, March 7, 2021
Home Maharashtra News चिपी विमानतळसेवा अखेर होणार रेडी टू फ्लाय

चिपी विमानतळसेवा अखेर होणार रेडी टू फ्लाय

जानेवारी २०२१ पासून चिपी विमानतळ कार्यान्वित होणार आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. चिपी विमानतळासाठी परवाना प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आयटी यंत्रणा, एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, प्रशिक्षित अग्निशमन दल अशा काही बाबींची त्वरित पूर्तता करण्याचे निर्देश विमानतळ विकासकांना देण्यात आले आहेत. तर जानेवारी २०२१ ची डेडलाईन गाठण्यासाठी सर्व भागदारकांशी समन्वय साधावा अशी विनंती केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाकडून राज्य शासनाला करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने नागरी उड्डाण महासंचालनालय आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांना आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी तसेच विमानतळ परवानाधारक असलेल्या आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विमानतळ विकासक यांना सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत.’ ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने चिपी विमानतळाचे उद्घाटन प्रजासत्ताकदिनी करण्याचे निश्चित केले आहे. चिपी विमानतळ कार्यान्वित करण्याच्या संदर्भात समितीच्या बैठकीत चर्चा झाली. राज्य सरकारच्या अधिका-यां समवेत या प्रकल्पाचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यानंतर उद्घाटनाची तारीख ठरविण्यात आली आहे.

चिपी विमानतळावर पहिली हवाई चाचणी १२ सप्टेंबर २०१८ रोजी यशस्वीपणे पार पडली होती. गणेशाची मूर्ती घेऊन विमान सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावर उतरले होते. चेन्नईहून एचडीएल कंपनीच्या खासगी विमानाने उड्डाण केले आणि गोवा मार्गे विमान सिंधुदुर्गात दाखल झाले होते. पहिल्या विमानाने विमानतळावर लॅन्डिंग केल्यावर सिंधुदुर्ग वासियांनी टाळ्यांचा कडकडाट करून आणि फटाके वाजवून आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर या विमानतळावर अजून वाहतूक सुरु झालेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग वासीय आणि चाकरमान्यांची काही प्रमाणात निराशा निर्माण झाली होती. त्यानंर मार्च २०१९ मध्येही सुरेश प्रभू, देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले होते. पण विमानसेवा मात्र अद्यापही सुरू होऊ शकली नव्हती. आता मात्र २६ जानेवारीला उद्घाटन होणारच अशी ग्वाही खा.विनायक राऊत यांनी मिडीयाला दिली आहे.

यावरून सुद्धा राजकीय वातावरण खवळून निघाले आहे. उद्घाटनाची घोषणा केल्यावर हे विमानतळ आपण बांधून पूर्ण केले असून विमान उतरवण्याची जबाबदारी घेतल्याचा दावा भाजप खासदार नारायण राणे यांनी केला आहे. त्यामुळे यावरुन आत्ता कोकणात मात्र श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. परंतु अखेर चिपी विमानतळावरून विमान सेवा रेडी टू फ्लाय होण्याचा श्रीगणेशा २६ जानेवारी २०२१ ला होण्याचे निश्चित झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments