Monday, March 1, 2021
Home Maharashtra News दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता

मागील ८ महिने संपूर्ण देश कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन मध्ये होता, त्यामुळे मार्च महिन्यापासून आत्ता दिवाळीपर्यंत कोरोन रुग्णांची वाढलेली संख्या काही प्रमाणात आटोक्यात यायला लागली होती. कोरोना पूर्णता: संपलेला नाही. त्याचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी व्हायला लागलेला आसताना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी खरेदीसाठी बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. लोकांची बेफिकिरी पण मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, गर्दीच्या ठिकाणी उपस्थित राहणे, सोशल डीस्टन्सिंगचे पालन न करणे, इ. अनेक गोष्टीमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता काही राज्यांनी तर पुन्हा संचारबंदी करण्यास सुरुवात केली आहे. देशभरामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारे उपाय योजना केल्या जात आहेत. गुजरातच्या अहमदाबाद आणि मध्य प्रदेशातील पाच शहरांमध्ये रात्रीच्या संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तर काही राज्यांमध्ये शाळा आणि बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर राज्याप्रमाणे, महाराष्ट्रामध्येही कोरोनाच्या रुग्ण संख्येत अचानक वाढ झाली आहे. राज्यामध्ये सोमवार २३ नोव्हेंबर पासून ९ वी ते १२ वीच्या वर्गांची शाळा , कॉलेज सुरु करण्याची तयारी असताना, कोरोनाची रुग्ण संख्या बघता वर्ष अखेरीपर्यंत शैक्षणिक संस्था उघडणार नसल्याचे संकेत आहेत. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असेलल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईत आता ३१ डिसेंबरपर्यंत सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा बंद राहणार आहेत.

मुंबई महापालिकेचा याबाबत आदेश

दिवाळीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा झालेली वाढ लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने याबाबत आदेश दिले आहेत. कारण काही ठिकाणी शाळा कॉलेजचा वापर कोविड सेंटर म्हणून केला गेला होता. त्याचप्रमाणे शाळा उघडण्याआधी सर्व शिक्षक वर्ग, इतर स्टाफ इ. सर्वांची कोविड टेस्ट करणे अनिवार्य केले आहे. त्याआधीच कोल्हापूर मधील १७ शिक्षकांची कोविड चाचणी पोझीटीव आल्याने खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने घेतलेला निर्णय यावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे असे सर्व स्तरातून बोलले जात आहे. कारण कोरोना काळातील आवश्यक असणार्या सर्व गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या २४ तासांमध्ये १०१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील २४ रुग्ण पोझीटीव आले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमधून कोरोना रुग्णांच्या  संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता इतर देशाप्रमाणे राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज वक्तव्य केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments