Monday, March 1, 2021
Home Maharashtra News आजपासून सर्वत्र सुरु होणार ड्राय रन

आजपासून सर्वत्र सुरु होणार ड्राय रन

नवीन वर्ष देशवासीयांसाठी विश्वासाची पहाट घेऊन आले आहे. आज २ जानेवारी पासून देशातील प्रत्येक राज्यात लसीकरणाचं ‘ड्राय रन’ अर्थात करोना लशीची रंगीत तालीम सुरू होणार आहे. २ जानेवारी पासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणाच्या रंगीत तालमीला सुरुवात होत आहे.

काही राज्यांमधील दुर्गम जिल्ह्यांमध्ये जेथे पोहोचणेही शक्य नाही किंवा लसीकरणाचे साहित्य घेऊन जाणेही शक्य नाही, अशा ठिकाणीही ही लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने सांगितले आहे. प्रत्यक्षात लसीकरणावेळी को-विन अॅप्लिकेशनच्या वापराच्या कार्यात्मक व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणे, तसेच नियोजन आणि अंमलबजावणी यांच्यातील संबंधांची चाचणी घेणे आणि आव्हाने ओळखणे, असा या रंगीत तालमीचा उद्देश आहे. यामुळे विविध स्तरांवरील कार्यक्रम व्यवस्थापकांचा आत्मविश्वास दृढ होण्यास मदत मिळेल, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ऐन लसीकरणामध्ये कोणत्याही प्रकरच्या अडचणी येऊ नयेत, त्यांचे आधीच निरसरन करण्यासाठी उद्या, २ जानेवारीपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-१९ च्या लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. ही रंगीत तालीम सर्व राज्यांच्या राजधानीमध्ये किमान तीन सत्रस्थळांमध्ये करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणाच्या रंगीत तालमीची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रधान आरोग्य सचिव आणि अन्य आरोग्य अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक घेतली. यात लसीकरणाच्या ठिकाणांवरील तयारीचा त्यांनी आढावा घेतला. लसीकरणासाठी योग्य जागा, साहित्य-साधनांचा पुरवठा, इंटरनेट जोडणी, वीज, सुरक्षा आदी सर्व गोष्टींनी संबंधित ठिकाण परिपूर्ण आहे की नाही याची माहिती देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.  त्याचप्रमाणे संबंधित ठिकाणांवर तीन खोल्यांच्या आराखड्यात स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी मार्ग असला पाहिजे.  यात जनजागृती संबंधीची माहिती दाखवण्यासाठी तसेच याठिकाणी आयईसी संबंधित सर्व सामग्रीचे प्रदर्शन करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध असली पाहिजे,  याकडेही लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. लसीकरणाच्या या रंगीत तालमीमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लशींचा पुरवठा, साठवण आणि शीतगृहांच्या साखळीच्या व्यवस्थापनासह पुरवठा व्यवस्थापनातही सुसज्ज करण्यात येणार आहे. केंद्राकडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना कोव्हिड १९ लशीसाठी तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments