Sunday, February 28, 2021
Home Devotion माघी गणेश जयंतीवरही कोरोनाचे सावट

माघी गणेश जयंतीवरही कोरोनाचे सावट

कोरोनाच्या संकटामुळं गेल्या कित्येक महिन्यांपासून किबहुना २०२० या संपूर्ण वर्षभरातच अनेक सणउत्सव साजरा करण्यावर निर्बंध आले. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी म्हणून अनेक परंपरातही खंडीत झाल्या. या साऱ्याचे परिणाम म्हणजे सध्याच्या घडीला आटोक्यात आलेला कोरोनाचा काही प्रमाणातील प्रसार. सध्याही परिस्थिती सावरलेली दिसत असली तरीही हे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. परिणामी अवघ्या काही दिवसांवर म्हणजेच १५ फेब्रुवारी २०२१ ला असणारी गणेश जयंती आणि तेव्हापासून सुरु होणाऱ्या माघ गणेशोत्सवासाठीही राज्य शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

maghi ganesh jayanti

फेब्रुवारी रोजी येणार्‍या माघी गणेश जयंतीकरिता भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून त्यांना बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. भाद्रपदातील गणेश चतुर्थी पेक्षा माघी गणेश साजरा करण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र कोरोनामुळे मूर्तींच्या संख्येतील घट आणि उंचीचे बंधन यामुळे मूर्त्यांचे प्रमाण कमी होऊन व्यवसायाला मंदीची झळ पोहचली होती. पण यंदा माघी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्त्यांची संख्या वाढली आहे. कारागिरांच्या हाताला काम मिळाल्याने मूर्ती शाळेत उत्साहाचे वातावरण पसरल्याचे ते म्हणाले. डहाणू फोर्ट येथे ८ ते १० मूर्तीशाळा असून मूर्त्यांचे आकार, रंगकाम यांची लगबग दिसून आली. भाद्रपदातील उत्सवावर विरजन पडल्यानंतर, यंदाच्या माघी उत्सवासाठी मूर्त्यांची संख्या ५०% नी वाढल्याची माहिती डहाणू फोर्ट येथील अष्टविनायक आर्ट मूर्ती व्यावसायिक आनंद राणा यांनी दिली.

Corona's savat on Ganesh Jayanti too

एकेकाळी धडकी भरेल अशा वेगाने हा विषाणू राज्यात आणि देशातही फैलावत होता. पण, लॉकडाऊन आणि काही निर्बंधांच्या काटेकोर पालनामुळं अशक्य वाटणाऱ्या या संसर्गावरही नियंत्रण मिळवण्यात आलं. दरम्यानच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रम, सण-उत्सवांचा जल्लोष रद्द झाला किंवा मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळं गेल्या कित्येक महिन्यांपासून किबहुना २०२० या संपूर्ण वर्षभरातच अनेक सणउत्सव साजरा करण्यावर कोरोनाचे सावट आलेचं. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना सरकर अवलंबित आहे. माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पांच्या मूर्ती निर्मितीच्या कामाची लगबग युद्ध पातळीवर सुरू झाली आहे. सोमवार,  १५ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गणेश जयंती असल्याने,  भक्तांकडून मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. यंदा गणेश मूर्तींच्या संख्येत वाढ झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments