Friday, February 26, 2021
Home Maharashtra News “येवा कोकण आपलोच असा” कोकणकिनारे पुन्हा गजबजणार

“येवा कोकण आपलोच असा” कोकणकिनारे पुन्हा गजबजणार

कोकण म्हंटले की खाण्यापिण्याची चंगळच असते. कोकण हे सात जिल्ह्यांनी बनलेले आहे. ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग. कोकण हे भौगोलिक, सांस्कृतिक आणि वास्तू अशा अनेकगोष्टीत आवड निर्माण करणारे ठिकाण आहे. कोकण किनारपट्टीवर सुपारीची, नारळाची झाडे, आंब्याची झाडे आहेत तसेच शेती, मंदिरे, खाडी, सागरी किल्ले, बंदरे, गरम पाण्याचे झरे, लेणी आणि कौलारू घरे येथे आहेत. महाराष्ट्रात कोकण हे एक मुख्य पर्यटन क्षेत्र आहे. कोकणातील सुंदर सागरी किनारे, हिरवीगार पालवी, जगप्रसिद्ध वारली कला आणि सागरी किल्ले याकडे पर्यटक सतत आकर्षित होतात. त्याचप्रमाणे आंबा, फणस, करवंदे, जांभूळ यांचा सुद्धा आस्वाद घेता येतो. रस्त्यांच्या कडेलाही विक्रेते आपले छोटेसे दुकान मांडून बसले असतात. कोकणच्या मेव्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. बहुतांश पर्यटक कोकणात जाऊन माशांवर यथेच्छ ताव मारतात. समुद्रकिनारी होणाऱ्या लिलावात स्वत: ताजी मासळी खरेदी करून त्याचा आस्वाद घेता येतो. घरगुती पद्धतीचे मासे तयार करून देणारी घरे समुद्र किनारी आहेत. याशिवाय खास कोकणी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक हॉटेल्स पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज असतात. कोकणची मिठाईदेखील चविष्ट आणि खास कोकणी पद्धतीची असते. आंबा पोळी, आंबा बर्फी, काजू बर्फी, अळूवडी, उकडीचे मोदक, जांभळ, फणस, करवंदाच्या फ्लेवरमधील चॉकलेट्स असे अनेक पदार्थ खवय्यांसाठी स्थानिक व्यावसायिक उपलब्ध करून देतात.

eco tourism in kokan opens after lockdown

समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे कोणत्याही ऋतुमध्ये कोकणात येण्यास पर्यटकांची ना नसते. महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबईपासून ते वेंगुर्ल्यापर्यंत पसरलेल्या या किनाऱ्यावर पर्यटकांना खिळवून ठेवणारी अनेक ठिकाणे आहेत. कोल्हापूरपासून ज‌वळ असलेले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे म्हणजे तळकोकण आहे. गडकिल्ले, धार्मिक स्थळे, सागरी किनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. त्याचप्रमाणे मालवणच्या समुद्रकिनारी वॉटर स्पोर्टस् उपलब्ध आहेत. बोटिंग, स्कुबा डायव्हिंग यासह पॅराशूटचीही मजा लुटता येते. खोल पाण्यात जाऊन समुद्रातील जलचरही पाहता येतात. मालवणपासून तारकर्ली, देवबागपर्यंतचा सुमारे १२ किलोमीटर अंतराचा समुद्रकिनारा साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे. या आकर्षक किनारपट्टीवर तंबु निवासाचीही सोय आहे. सुट्ट्या सुरू होताच कोकणातील पर्यटकांची गर्दी कायम वाढलेलीचं असते. सर्व समुद्र किनारे फुल झालेले दिसतात.

water sports in kokan

कित्येक महिन्यांपासून बंद असणारे वॉटरस्पोर्ट्स आता शासनाच्या नव्या एसओपीसह पुन्हा सुरु करणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळं कोकणच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. याशिवाय वॉटरस्पोर्ट्सचा व्यवसाय असणाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासा ठरत आहे. कोकणातील किनाऱ्यांवर असणारे वॉटर स्पोर्ट्स लवकरच सुरु होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री सकारात्मक असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. यासाठीची रितसर नियमावली तयार करण्याचे कामही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही अपेक्षित नियमावली तयार झाल्यानंतर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वॉटरस्पोर्ट्स लवकरच सुरु होणार असण्याची चिन्ह दिसत आहेत. आणि सर्व कोकणवासीय “येवा कोकण आपलोच असा” म्हणायला देखील सज्ज.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments