Friday, February 26, 2021
Home Maharashtra News वाहिन्यांवरील भोंदूगिरीच्या जाहिरातींना हायकोर्टचा दणका

वाहिन्यांवरील भोंदूगिरीच्या जाहिरातींना हायकोर्टचा दणका

बर्‍याचदा उच्चभ्रू आणि सुशिक्षित लोकंही मंत्र-तंत्र, काळा जादू यांसारख्या गोष्टींकडे आकर्षित होत असल्याचं अधोरेखित करत हायकोर्टानं विविध प्रसार माध्यमे अथवा वाहिन्यांवर दाखविण्यात येणाऱ्या अश्या भोंदूगिरीच्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महाराष्ट्रात वाहिन्यांवर पुन्हा या जाहिराती झळकू नयेत म्हणून विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देत केंद्र आणि राज्याला ३० दिवसांत यावर काय कारवाई केली.

hanuman yantra

वृत्तवाहिन्या अथवा काही विशेष मनोरंजन वाहिन्यांवर धर्माची भीती दाखवून हनुमान चालिसा, देवी देवतांचे यंत्र, इत्यादी वस्तू विकण्याच्या जाहिराती दाखविल्या जातात. या भोंदूगिरीच्या माध्यमातून ग्राहकांची एकप्रकारे लूटच करण्यात येते. राज्य शासनाच्या साल २०१३ मधील अघोरी कृत्य आणि काळी जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार प्रसार माध्यमांवरील अशा जाहिरातींच्या प्रक्षेपणावर बंदी आहे. मात्र तरीही या जाहिराती सर्रासपणे प्रसारित केल्या जातात.

त्याविरोधात साल २०१५ मध्ये औरंगाबादच्या सिडको भागातील रहिवासी राजेंद्र गणपतराव अंभोरे या ४५ वर्षीय शिक्षकाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती एम. जी. शेवलीकर यांच्यापुढे सुनावणी पार पडली. तेव्हा, अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला वेसण लागून समाज मनात विज्ञानाप्रती ओढ निर्माण व्हावी, यासाठी संबंधित साल २०१३ चा कायदा करून प्रत्येक पोलीस ठाण्यात एक खास पोलीस अधिकारी नियुक्त केला आहे, अशी बाजू याचिकाकर्त्यांच्या वतीने मांडण्यात आली. त्यावर मार्च २०१५ मध्ये वाहिन्यांवरील हनुमान चालीसा यंत्राच्या जाहिरातींमध्ये या यंत्रामध्ये विशेष, चमत्कारी आणि अलौकिक गुणधर्म असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र या जाहिरातींचा हेतू निव्वळ यंत्राच्या विक्रीला प्रोत्साहन देण्याचा होता, कोणत्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा नव्हता. असा दावा न्यायालयीन मित्र म्हणून काम पाहणा-या ज्येष्ठ वकील व्ही. डी. सकपाळ आणि हेमंत सुर्वे यांनी केला.

अघोरी कृत्य आणि काळी जादू कायदा २०१३  आणि टेलिव्हिजन नेटवर्क्स कायदा या प्रकरणात लागू होत नाही असा दावा इंदूर येथील टेलिमार्ट शॉपिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या वाहिनीच्या वतीने करण्यात आला. या जाहिरातींमध्ये नमूद केलेले विधी हिंदू प्रथेनुसार असून कोणत्याही जादूटोण्याच्या प्रकारात मोजता येणार नाहीत अशी बाजू वाहिनीच्या वतीनं मांडण्यात आली. त्याची दखल घेत कायद्याच्या कलम ३ मध्ये केवळ काळ्या जादू, दुष्कर्म इत्यादी कृती करण्यासच नव्हे तर अशा पद्धतींचा प्रचार किंवा  प्रसार करणे यावरही बंदी आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments