Sunday, February 28, 2021
Home Maharashtra News वाहनांना फास्ट टॅग सक्तीचे नाहीतर टोल दुप्पट

वाहनांना फास्ट टॅग सक्तीचे नाहीतर टोल दुप्पट

मुंबईतील टोल नाके किंवा एक्सप्रेस वे वरील टोल नाके असू देत सर्वच ठिकाणी टोल नाक्यावर मोठी वाहतूककोंडी होत असते. त्यावेळी वेळ आणि इंधन तर वाया जातेच पण पर्यावरणाचा देखील -हास होतो. त्यात विनाकारण हॉर्न वाजवून अनेक वाहन चालक ध्वनी प्रदुषणही करतात तर टोल वरुन वाहन चालक आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी, धक्काबुक्की आणि शिविगाळीचे प्रकार वाढतच जात आहेत. हे सर्व टाळण्यासाठी गेली वर्षभरापासून फास्ट टॅग सक्तीचे करण्यात आले आहे. आता तर पुढील वर्षापासून कडक अंलबजावणी करण्यात येणार आहे.

fasttag in maharashtra

राज्यातील प्रत्येक टोल नाक्यावरुन जाणाऱ्या एकूण गाड्यां पैकी अंदाजे ५० टक्के गाड्यांनीच फास्ट टॅग लावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जोपर्यंत फास्ट टॅग सक्ती केली जात नाही तोपर्यंत टोल नाक्यावरील वाहकूत कोंडी कमी होणार नाही हाच हेतू लक्षात घेवुन आता सर्व गाड्यांना फास्ट टॅग सक्तीचे केले गेले आहे. पहिल्या टप्प्यात फास्ट टॅग खासगी बँका, पेमेंट एपद्वारे मिळवण्याची सुविधा देण्यात आलीय आहे. आता तर प्रत्येक टोल नाक्यावर टोल चालकांमार्फत फास्ट टॅग काढण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असून त्याबाबत जनजागृती ही केली जाणार आहे. टोल नाक्यावर वाहनांकडून टोल घेताना लांबच्या लांब रांगा लागतात त्यामुळे नागरीकांचा बराच वेळ वाया जातो. त्यासाठी फास्ट टॅग ची सुविधा करण्यात आली.

fast tag india for toll

१५ डिसेंबर पासून सर्व टोल नाके कॅशलेस झाले असले तरीही कॅश लेनही सुरु राहतील मात्र त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार असल्याचे ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होत असते. काही वेळेला दोन दोन तास वाट पाहावी लागते. त्यामुळे नागरीकांचा वेळ वाया जातो. जर फास्ट टॅग प्रत्येक वाहनांना लावले गेले तर टोल नाक्यावर वाहकूत कोंडी होणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होऊन तो वेळ कुठेतरी सत्कारणी लागेल आणि टोल नाक्यावर वसूल केल्या जाणाऱ्या पैशांची मोजदाद करणे देखील सोयीस्कर होईल त्यामुळे प्रत्येक गाडीवर फास्ट टॅग असणे गरजेचे आहे असे मत यावेळेस त्यांनी व्यक्त केले. नवीन वर्षापासून १ जानेवारीपासून विना फास्ट टॅग लावलेल्या गाड्या टोल नाक्यावरून गेल्या तर त्यांना दुप्पट टोल आकारला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments